Pattan Kodoli Vitthal Birdev Yatra | विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं!

पट्टणकोडोलीतील यात्रेस प्रारंभ; ढोल-ताशांचा निनादाने परिसर दुमदुमला; भंडाऱ्याची अखंड उधळण, लाखो भाविकांची उपस्थिती
Pattan Kodoli Vitthal Birdev Yatra
पट्टणकोडोली : श्री विठ्ठल बिरदेव यात्रेसाठी उपस्थित असलेले भक्तगण आणि यात्रेनिमित्त भंडाऱ्याच्या उधळणीनंतर पट्टणकोडोलीला आलेली सोन्याची झळाळी. (Pudhari Photo)
Published on
Updated on

शिरीष आवटे

पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे ‌‘विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं...‌’च्या जयघोषात व ढोल, कैताळाच्या तालावर भंडारा, खारीक व खोबऱ्याची प्रचंड उधळण करीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध प्रदेश व गोवा राज्यांत प्रसिद्ध असलेल्या पट्टणकोडोलीच्या यात्रेस रविवारी भाकणुकीने उत्साहात सुरुवात झाली.

दुपारी यात्रेचे प्रमुख मानकरी प्रकाश पाटील, रणजित पाटील, चौगुले, कुलकर्णी, गावडे, मगदूम, देवस्थान कमिटी, ग्रामस्थ, पुजारी धनगर समाज मोठ्या लवाजम्यासह मानाच्या दुधारी तलवारीचे पूजन करून वाजतगाजत खेलोबा फरांडेबाबा भेटीसाठी आले. यावेळी धनगरी ढोल, छत्र्या, मानाची बाशिंगे घेऊन धनगर समाजाच्या पंचमंडळींनी फरांडेबाबांना आलिंगन देऊन मंदिरात येण्याचे निमंत्रण दिले. निमंत्रण स्वीकारून खेलोबा फरांडेबाबा हेडाम नृत्य (तलवारीने पोटावर वार करीत) खेळत व भक्तगण ‌‘बिरोबाच्या नावानं चांगभलं...‌’चा गजर करत मंदिरात आले.

image-fallback
कोल्हापूर : पट्टणकोडोलीतील ‘पेयजल’ अपूर्णच !

यावेळी संपूर्ण परिसर भंडाऱ्याने पिवळा झाला होता. त्यामुळे वातावरणाला सोन्याची झळाळी आली होती. भाकणूक ऐकण्यासाठी लाखो भक्त मंदिर व परिसरात जमले होते. भाकणूक होताच फरांडेबाबा श्री विठ्ठल बिरदेवाचे दर्शन घेऊन मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या गादीवर विराजमान झाले. भाविकांनी फरांडेबाबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यात्रेतील भाकणूक कार्यक्रम रविवारी असला तरी सोमवारी दुसरी व तिसरी पालखी, मंगळवारी भर यात्रा, चौथी पालखी, सार्वजनिक नैवेद्य, बुधवार, दि. 15 रोजी फूट यात्रा, पाचवी पालखी, आराधना, गुरुवार, 16 रोजी गोंधळ नृत्य सोहळा आणि शुक्रवार, दि. 17 रोजी फरांडे महाराजांचा निरोप समारंभ होणार आहे.

Pattan Kodoli Vitthal Birdev Yatra
Halsiddhnath Yatra 2025 | हालसिद्धनाथ यात्रा 8 ऑक्टोबरपासून

मंदिर परिसर भंडाऱ्याने न्हाला

श्री विठ्ठल बिरदेवाची यात्रा भव्य प्रमाणात भरली असून, स्वेटर दुकाने, घोंगडी, मिठाई, भंडारा खेळणी, खाद्यपदार्थ, खारीक, खोबरे विक्रेत्यांची दुकाने आली आहेत. भंडाऱ्याची प्रचंड उधळण झाल्याने मंदिर परिसरात भंडाऱ्याचे थर साचले आहेत. यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान यात्रा कमिटी, ग््राामपंचायत प्रशासन, शासकीय यंत्रणा, पोलिस यंत्रणा परिश्रम घेत आहे.

image-fallback
कोल्हापूर : पट्टणकोडोलीतील ‘पेयजल’ अपूर्णच !

फरांडेबाबांची भाकणूक

पर्जन्य : सात दिवसांत पाऊस पडेल.

बळीराजा : रोहिणीचा पाऊस, मृगाचा पेरा पूर्ण देशात होईल.

धारण : दोन, सव्वा दोन, अडीच आपल्या मनाप्रमाणे होईल.

महागाई : मिरची, रसभांडे कडक होईल.

भू माता : भारतीय लष्कराचे शौर्य जगात चमकेल.

आशीर्वाद : नवल्या मी होईन आणि हातात काठी घेऊन स्वत: मेंढ्या राखीन.

राजकारण : राजकारणात गोंधळ होऊन उलथापालथ होईल, धर्माचे, भगव्याचे राज्य येईल.

रोगराई : देवाची सेवा करणाऱ्यांची रोगराई दूर होईल.

कांबळा : माझ्या गुरूचे चरण जो धरेल, त्याला मी सदैव कांबळ्याखाली धरेन.

पट्टणकोडोली : हेडाम खेळताना फरांडे बाबा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news