ZP panchayat samiti election | विजयाचा गुलाल सोमवारी दुपारपर्यंत उधळणार

ZP panchayat samiti election |
ZP panchayat samiti election | विजयाचा गुलाल सोमवारी दुपारपर्यंत उधळणार
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा विजयाचा गुलाल सोमवारी (दि. 9) दुपारी दोन वाजेपर्यंत उधळला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या 68, तर पंचायत समितीच्या 136 मतदार संघाच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. टपाली मतदानाची एकूण 53, तर ईव्हीएमवरील मतांची 197 अशा एकूण 250 टेबलवर मोजणी होणार असून, 188 मतमोजणीच्या फेर्‍या होणार आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शनिवारी मतदान होणार असून, सोमवारी मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. टपाली आणि ईव्हीएमवरील मतमोजणीला एकाचवेळी प्रारंभ केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. मतमोजणीच्या 10 ते 22 फेर्‍या होणार आहेत. सर्वाधिक 22 फेर्‍या हातकणंगले तालुक्यात होणार आहेत. सर्वात कमी प्रत्येकी 10 फेर्‍या आजरा आणि भुदरगड तालुक्यांत होणार असल्याचे येडगे यांनी सांगितले.

मिरवणूक, रॅली, डीजे, फटाके व गुलालावर बंदी

मतमोजणीनंतर मिरवणूक, रॅली काढणे, डीजे किंवा डॉल्बी सिस्टीम लावणे, मोटारसायकलचे सायलेन्सर काढून वाहन चालविणे, सार्वजनिक ठिकाणी गुलाल उधळणे अथवा त्याचा वापर करणे तसेच फटाके लावणे, फोडणे याला बंदी घालण्यात आली आहे. अशा घटनांचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. मतमोजणी परिसरात सकाळी 7 वाजल्यापासून कलम 163 लागू केले आहे. मतमोजणी ठिकाणापासून 200 मीटर सभोवतालच्या परिसरात परवानगी व्यतिरिक्त मोटारगाड्या, वाहनांचा वापर, मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट आदी वापरण्यास मनाई केली आहे.

आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज

शनिवारी जिल्ह्यात 2004 आरोग्य पथके तैनात केल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली. मतदार, मतदान कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी 2 हजार 691 बूथवर आरोग्य सेवा दिली जाणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तातडीच्या उपचारांसाठी आवश्यक औषधांसह आरोग्य पथकासह सर्व 81 प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णवाहिकेसह 24 तास सुरू ठेवण्यात येणार आहेत.

मतदानासाठी 331 क्षेत्रीय अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात एकूण 618 मार्ग निश्चित केले आहेत. मतदान पेट्यांची ने- आण, राखीव ईव्हीएमची ने-आण करण्यासाठी 335 एसटी बस, 65 खासगी बस व 218 जीप अशा 618 वाहनांचा वापर केला जाणार आहे. जिल्ह्यात 20 लाख 97 हजार 507 मतदारांना मतदार चिठ्यांचे वाटप केले आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक समन्वयक अधिकारी डॉ. संपत खिलारी उपस्थित होते.

एका ईव्हीएमवर दोन मतपत्रिका

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी एकाच ईव्हीएमवर दोन मतपत्रिका असून, प्रत्येक मतदाराला प्रत्येकी दोन मते द्यावी लागणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. प्रत्येक ईव्हीएमवर जिल्हा परिषदेसाठी उमेदवारांची शुभ— रंगाची मतपत्रिका, तर त्याखाली पंचायत समितीच्या उमेदवारांची गुलाबी रंगाची मतपत्रिका आहे. पट्टणकोडोलीत दोन ईव्हीएम वगळता उर्वरित सर्व मतदान केंद्रांवर एकच ईव्हीएम वापरण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news