Bazarbhogav Health Centre | अंथरुणातच आढळला विषारी मण्यार; बाजारभोगाव आरोग्य केंद्रातील प्रकार

बाजारभोगाव : अंथरुणातच आढळलेला विषारी मण्यार जातीचा साप.
बाजारभोगाव : अंथरुणातच आढळलेला विषारी मण्यार जातीचा साप.
Published on
Updated on

बाजारभोगाव : बाजारभोगाव (ता. पन्हाळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रपाळीवर असलेल्या महिला कर्मचाऱ्याच्या अंथरुणात विषारी मण्यार साप आढळल्याने रविवारी पहाटे एकच खळबळ उडाली. सुदैवाने सापाने दंश केला नसला, तरी या प्रकारामुळे कर्मचारी, रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शनिवारी रात्री आरोग्य साहाय्यिका सारिका पाटील व नर्सिंग कर्मचारी टोणपे मावशी नर्सिंग रूममध्ये झोपल्या होत्या. पहाटे पाटील यांच्या अंथरुणात साप असल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने खोलीबाहेर येऊन आरडाओरड केली. सर्पमित्र सारिका कोकाटे यांना बोलावण्यात आले. त्यांनी साप सुरक्षितपणे पकडून बाहेर सोडला. हा विषारी मण्यार असल्याचे त्यांनी सांगितले. पंचायत समिती सदस्य दत्तात्रय खोत यांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच रुग्ण व कर्मचाऱ्यांना धीर देत शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना तातडीने घरी पाठवण्याची व्यवस्था केली.

जनरेटर असूनही अंधार

आरोग्य केंद्रात जनरेटरची सुविधा असली, तरी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यास तो सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे रात्रपाळीसाठी पुरुष शिपायाची नियुक्ती करणे गरजेचे असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news