

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : वाडी रत्नागिरी (ता.पन्हाळा) च्या पायथ्याला गिरोली -जोतिबा डोंगराच्या हद्दीत एका अनोळखी व्यक्तीचा गळा दाबून खून झाल्याची घटना आज (दि.१९) दुपारी उघडकीस आली आहे. खून झालेल्या व्यक्तीचे अंदाजे वय ४० ते ४५ वर्षे आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.