kolhapur | पूरस्थितीमुळे विद्यापीठाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या

University exams postponed due to floods
पूरस्थितीमुळे विद्यापीठाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलल्याPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत बी.टेक अभ्यासक्रमाची पुनर्परीक्षा सुरू होती. परंतु, गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसामुळे काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही गावांचे रस्तेही बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने बी.टेक अभ्यासक्रमाच्या दोन विषयांचे पेपर पुढे ढकलले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बी.टेक अभ्यासक्रमाच्या सुरू असलेल्या पुनर्परीक्षेचे गुरुवार, 21 ऑगस्ट आणि शुक्रवार, 22 ऑगस्ट रोजी होणारे दोन पेपर पुढे ढकलले आहेत. गडहिंग्लजमधील ए. डी. शिंदे कॉलेज व म्हागाव येथील बी.टेक कॉलेज परिसरात पावसाने रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. 21 ऑगस्टचा पेपर 4 सप्टेंबरला आणि 22 ऑगस्टचा पेपर 8 सप्टेंबरला घेतला जाणार आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news