शिक्षणासाठी पायपीट करणार्‍या विद्यार्थ्यांना ‘पुढारी’ देणार बळ !

दै. ‘पुढारी’चा अनोखा ‘पायपीट’ उपक्रम; अभिषेक व डॉ. नेहा शहा दाम्पत्याचे सहकार्य
Unique 'Pipeet' initiative of the daily 'Pudhari'
अभिषेक दिलीप शहा, डॉ. नेहा अभिषेक. शहाPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कधी गुडघाभर चिखल, तर कधी माती आणि दगडधोंडे, कधी खळखळणारं पाणी, तर कधी भीतीदायक प्रवाह अशा अनेक संकटांना पायदळी तुडवत केवळ शिक्षणाची आस घेऊन दुर्गम वाड्या-वस्त्यांतील शेकडो विद्यार्थ्यांची पायपीट दरवर्षी सुरूच असते. या विद्यार्थ्यांच्या जिद्दीला सलाम करीत त्यांच्या संघर्षाला बळ देत दै. ‘पुढारी’ ‘पायपीट’ या अनोख्या उपक्रमाद्वारे अशा विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणार आहे. तिही त्यांच्याच शाळेत आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी दिली जाणार आहे.

नवीन शैक्षणिक वर्षारंभ सोमवार, दि. 16 जूनपासून होत आहे. यादिवशी जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळेमध्ये चालत येणार्‍या विद्यार्थ्यांचे शालेय उपयोगी भेटवस्तू व शुभेच्छापत्र देऊन स्वागत केले जाणार आहे. यानिमित्त दुर्गम वाड्या-वस्त्यांमधील शिकणार्‍या मुलांना दै. ‘पुढारी’ची साथ मिळणार आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार, दि. 16 जून रोजी शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. जिल्ह्यात आजही दुर्गम वाड्यांवर शाळांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना कित्येक किलोमीटर चालत शाळेला जावे लागते. अशा विद्यार्थ्यांना ऊर्जा देण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने दै. ‘पुढारी’ने हा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअर अभिषेक दिलीप शहा व डॉ. नेहा अभिषेक शहा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. दि. 16 जून रोजी शाळेचा पहिला दिवस. या निमित्ताने जिल्ह्यातील काही निवडक शाळांमध्ये पायपीट करत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ दै. ‘पुढारी’च्या वतीने आयोजित केला आहे.

पायपीट उपक्रमासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. मीना शेंडकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुवर्णा सावंत यांच्यासह प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, गावचे सरपंच व सदस्य, शालेय समितीचे अध्यक्ष व सदस्य कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

या शाळांत होणार पायपीट उपक्रम

विद्यामंदिर बोळावी (ता. कागल)

विद्यामंदिर हणबरवाडी (ता. कागल)

विद्यामंदिर वासनोली (ता. भुदरगड)

विद्यामंदिर मिणचे बुद्रुक (ता. भुदरगड)

केंद्रीय प्राथ. शाळा गवसे (ता. आजरा)

विद्यामंदिर गवशी गावठाण (ता. राधानगरी)

विद्यामंदिर दूधगंगानगर, (काळम्मावाडी, ता. राधानगरी)

विद्यामंदिर उपवडे (ता. करवीर)

विद्यामंदिर बिजूर (ता. चंदगड)

विद्यामंदिर चन्नेकुप्पी (ता. गडहिंग्लज)

विद्यामंदिर असंडोली (ता. गगनबावडा)

विद्यामंदिर खापणेवाडी (ता. पन्हाळा)

आदर्श माध्यमिक वि. गजापूर (ता. शाहूवाडी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news