Uday Samant | ‘पदवीधर’मध्ये डॉ. स्मिता जाधव यांच्या मागे महायुतीची एकजूट

उद्योगमंत्री उदय सामंत; विजयाचा केला निर्धार
कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करत, त्यांच्या विजयाचा निर्धार करताना शिवसेनेचे नेते, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री 
प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर,  माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, अमित हुक्केरीकर आदी.
कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करत, त्यांच्या विजयाचा निर्धार करताना शिवसेनेचे नेते, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, अमित हुक्केरीकर आदी.
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या मागे महायुतीची एकजूट भक्कमपणे उभी असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले. पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होत आहे; मात्र पुणे पदवीधर मतदारसंघात कोणतीही तडजोड नसून भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनाच पहिल्या पसंतीचे मत देऊन, मोठ्या मताधिक्यांनी विजयी करण्याचा निर्धार शिवसेनेच्या मेळाव्यात त्यांनी केला.

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या सामंत यांनी शिक्षक मतदारसंघासाठी मेळावा घेतला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सामंत म्हणाले, शिवसेनेची जिल्ह्यात मोठी ताकद आहे. डॉ. स्मिता जाधव यांच्या मागे महायुती म्हणून आम्ही सर्वजण एकजुटीने उभे आहोत. त्यामुळे डॉ. जाधव यांच्याविषयी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा झाली असून त्यांनी देखील स्मिता जाधव यांच्या विजयाबद्दल पूर्ण विश्वास व्यक्त केला असल्याचे सामंत यांनी सांगितले.

सामंत म्हणाले, डॉ. स्मिता जाधव यांच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. स्मिता जाधव यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले काम, सर्वसामान्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी असलेला त्यांचा थेट संपर्क आणि पदवीधरांच्या प्रश्नांवर केलेले कार्य यामुळे मतदारांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्याच पसंतीची मते अत्यंत महत्त्वाची असतात. यामुळे जाधव यांना मिळणारा पाठिंबा आणि महायुतीची एकजूट यामुळे डॉ. जाधव या पहिल्याच फेरीतच बाजी मारतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुणे पदवीधरच्या संपूर्ण मतदारसंघात महायुती म्हणून सर्वच पक्ष डॉ. जाधव यांच्या पाठीशी एकजुटीने उभे आहेत. यामुळे त्यांच्याविषयी अनुकूल वातावरण तयार झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, पदवीधरमध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही, महायुतीच्या उमेदवार म्हणून डॉ. जाधव यांचा विजय निश्चित आहे. त्यासाठी महायुतीचे सर्वच घटक पक्ष एकदिलाने, एकसंघपणे कामाला लागले आहेत. कार्यकर्त्यांनीही डॉ. जाधव यांच्या विजयासाठी कसलीही कसर ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. खासदार धैर्यशील माने यांनीही डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयात शिवसेनेचाही मोठा वाटा राहील, अशा पद्धतीने सर्व शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन केले.

यावेळी आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी अमित हुक्केरीकर, महापालिका शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, रत्नेश शिरोळकर, अभिजित खतकर, अजय इंगवले, अश्किन आजरेकर, वैभव माने, शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी मुरलीधर जाधव उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news