kolhapur | कत्तल केलेल्‍या झाडांचे दहा टन लाकूड गेले कुठे?

Kolhapur market committee
कोल्हापूर बाजार समिती (Pudhari Photo)
Published on
Updated on

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर शेती उत्‍पन्‍न बाजार समितीमधील दोन डेरेदार वृक्षांची कत्तल केल्‍याचा प्रकार घडला असून, झाडे तोडणार्‍यांना महापालिकेसह समितीने नोटीस बाजावली आहे. समितीने कारवाईसाठी पाऊल उचलले असले, तरी कत्तल केलेल्‍या झाडाचे सुमारे दहा टन लाकूड गेले कुठे? असाही प्रश्‍न उपस्‍थित होत आहे.

बाजार समितीच्‍या मुख्‍य इमारतीच्‍या पाठीमागील बाजूस असणार्‍या दोन डेरेदार वृक्षांची नुकतीच कत्तल केली. याप्रकरणी समितीने एक विद्यमान संचालक व एक माजी सचिव यांच्‍या सुपुत्रांना नोटीस बजावली आहे. झाडे तोडल्‍यानंतर समितीला जाग आली. मात्र, हे भलेमोठे वृक्ष तोडण्‍याचा प्रकार समितीच्‍या निदर्शनास कसा आला नाही हा मोठा प्रश्‍न आहे. समितीमधीलच काही अधिकार्‍यांच्‍या पाठबळाने हा प्रकार घडला असल्‍याची चर्चा आहे.

महापालिकेने केला पंचनामा

प्रकाराची माहिती मिळताच महापालिका उद्यान विभागाचे अधीक्षक समीन व्‍याघ्रांबरे यांनी सहायक निरीक्षक, मुकादम यांच्‍यासमवेत घटनास्‍थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी अहवाल तयार करून संबंधितांना नोटीस बजावली जाणार आहे. झाडे तोडणार्‍यांचा खुलासा आल्‍यानंतर त्‍यामधील तथ्‍य तपासून पुढील कार्यवाही केली जाणार असल्‍याचे व्‍याघ्रांबरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news