Ambabai temple crowd | तीन दिवसांत दोन लाख भाविकांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

सलग सुट्टीची पर्वणी साधत पर्यटकांची गर्दी
Ambabai temple crowd |
कोल्हापूर : सलग सुट्टी असल्याने रविवारी अंबाबाई दर्शनासाठी झालेली भाविकांची गर्दी. (छाया : मिलन मकानदार)
Published on
Updated on

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी जोतिबाची चैत्र यात्रा, त्याला जोडूनच आलेला अंबाबाई रथोत्सव आणि वीकेंड यामुळे शुक्रवार (दि. 3) ते रविवार (दि. 5) एप्रिल या कालावधीत तब्बल दोन लाख भाविकांनी करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले.

अंबाबाई दर्शनला तर वर्षभर गर्दी असतेच; पण सध्या सुरू झालेल्या उन्हाळी सुट्ट्या आणि यात्रा-जत्रांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर परगावचे भाविक अंबाबाई दर्शनाला येत आहेत. नुकतेच वाडी रत्नागिरी डोंगरावरील श्री जोतिबा देवाची यात्रा बुधवारी झाली. या यात्रेसाठी लाखो भाविक कोल्हापुरात दाखल झाले होते. यात्रा झाल्यावर होणार्‍या शहरातील रथोत्सवांना भक्तांनी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारी 3 रोजी 47025, शनिवारी 4 रोजी 69425, तर रविवारी वीकेंडच्या अखेरच्या दिवशी 81 हजार 925 भाविक अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आले होते. एकूण तीन दिवसांमध्ये अंबाबाई दर्शन घेणार्‍या भक्तांचा आकडा 2 लाखांवर पोहोचला. सध्या उन्हाळी सुट्ट्यांचे दिवस असल्यामुळे इथून पुढे दर्शनासाठी भक्तांची गर्दी वाढेल, असा अंदाज देवस्थान समितीने व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news