kolhapur Trolley Accident Case | हूक तुटून ट्रॉली अंगावरून गेल्‍याने दोघांचा मृत्‍यू

kolhapur Trolley Accident Case |
kolhapur Trolley Accident Case | हूक तुटून ट्रॉली अंगावरून गेल्‍याने दोघांचा मृत्‍यू
Published on: 
Updated on: 

उत्तूर : धामणे (ता. आजरा) येथे ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा हूक तुटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्‍यू झाला. गुरुवारी (दि. १९) रात्री साडेदहाच्या सुमारास धामणे-बेलेवाडी रस्त्यावर हा अपघात घडला. महादेव दिनकर करवळ (वय ४९, रा. सोनारवाडी) आणि बचाराम शिवाजी सुतार (६५, रा. मिणचे खुर्द, ता. भुदरगड) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही संताजी घोरपडे साखर कारखान्याचे कामगार होते. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला.

करवळ व सुतार हे दोघे दुचाकीवरून जात होते. याचवेळी हा अपघात झाला. याप्रकरणी संदीप नारायण पोवार यांनी आजरा पोलिसांत फिर्याद दिली आहे. अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मंत्री हसन मुश्रीफ यांनी घटनास्थळी भेट देत मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.