Two Thieves Arrested | दोघा सराईत चोरट्यांना अटक; दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

Two Thieves Arrested |
Two Thieves Arrested | दोघा सराईत चोरट्यांना अटक; दीड लाखाचा मुद्देमाल जप्त
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : कंदलगाव (ता. करवीर) येथे रिसॉर्टच्या बांधकामाशेजारील पत्र्याच्या शेडमधील चोरीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने २४ तासांत छडा लावला. याप्रकरणी आदित्य भीमराव दिंडे (वय २४) व ऋत्विक बबनराव जाधव (वय २५, दोघे रा. राजारामपुरी, १४ वी गल्ली) यांना अटक केली. त्यांच्याकडून मोपेडसह दोन वेल्डिंग मशिन, ग्राईंडर मशिन आणि कटावणी असा १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

कंदलगाव (ता. करवीर) येथील रिसॉर्ट बांधकामाशेजारील शेडचे कुलूप उचकटून १० ते १२ नोव्हेंबरदरम्यान दोन वेल्डिंग मशिन व ग्राईंडर मशिनची चोरी झाली होती. याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून सुरू होता. पोलिस अंमलदार संतोष बरगे व विशाल खराडे यांना ही चोरी आदित्य दिंडे व ऋत्विक जाधव यांनी केल्याची माहिती मिळाली. या दोघांना टेंबलाई मंदिराजवळ सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. आदित्य दिंडेवर चोरीचे १० गुन्हे दाखल आहेत.

पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार वैभव पाटील, सत्यजित तानुगडे, शिवानंद मठपती, रवी लंबे, राजू येडगे, महेंद्र कोरवी, प्रदीप पाटील, संजय हुंबे, सागर चौगले यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.