

इचलकरंजी : पूर्ववैमनस्य आणि वर्चस्वाच्या वादातून जातिवाचक शिवीगाळ करीत केलेल्या मारहाणीत रोहित हौसेराव कांबळे (वय 28, रा. दत्तनगर, कबनूर) आणि विशाल विजय दंडवते (वय 36) हे दोघे जखमी झाले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून उमेश दिलीप जाधव (वय 24), समर्थ संतोेष शिंदे (वय 19) आणि विकास कुमार कोमटे (वय 19, तिघे रा. दत्तनगर, कबनूर) या तिघा संशयितांना अटक केली. याची माहिती पो. नि. सचिन पाटील यांनी दिली.
रोहित कांबळे आणि त्याचा मित्र विशाल दंडवते हे दोघे 10 मार्चच्या रात्री कबनूर ओढ्याजवळ थांबले होते. यावेळी उमेश जाधव, विकास कोमटे आणि समर्थ शिंदे या तिघांनी विशालला शिवीगाळ करत गाडीतून खाली उतरण्यास सांगत मारहाण सुरू केली. त्याचवेळी नीलेश जाधव, विशाल कोमटे हे चंदूर आभार फाट्यावरून आले. त्यांच्यातील भांडण सोडवण्यास गेलेल्या रोहित कांबळे यालाही जातिवाचक शिवीगाळ करत नीलेश जाधव याच्यासह पाच जणांनी मारहाण केली. या मारहाणीत रोहित आणि विशाल जखमी झाले आहेत. शिंदे, कोमटे व जाधव या तिघा संशयितांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.