

कोल्हापूर : शिवाजी उद्यमनगर येथील प्रसाद बार अँड रेस्टॉरंटमध्ये तोडफोड करून महिन्याला 25 हजारांचा हप्ता मागणार्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. मंदार मधुकर दिंडे (वय 24) व फिरोज यासीन मुल्ला (34, रा. दोघेही यादवनगर) अशी त्यांची नावे आहेत. 9 एप्रिल रोजी रात्री 9.45 च्या सुमारास ही घटना घडली.
दिंडे व मुल्ला हे यादवनगरात शेजारी राहतात. दोघेही 9 एप्रिल रोजी बारमध्ये दारू पिण्यास गेले होते. त्याठिकाणी सर्व्हिस देण्यास उशीर झाला या कारणावरून फिर्यादी अनिष श्रीधर शेट्टी (वय 42, रा. प्रतिभानगर) यांच्याशी भांडण काढले. तसेच शेट्टी यांच्या अंगावर पाण्याची बाटली फेकून मारली. खुर्ची घेऊन मारायला धावून गेले. त्यानंतर बार चालवायचा असेल तर महिना 25 हजार रुपये हप्ता द्यायचा अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी 9 एप्रिलला मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी दोघांना अटक केली.