Trader Robbery Case | गुटखा, पानमसाला वाहतूक करणार्‍या व्यापार्‍यांना लुटणारे दोघे गजाआड

Trader Robbery Case |
Trader Robbery Case | गुटखा, पानमसाला वाहतूक करणार्‍या व्यापार्‍यांना लुटणारे दोघे गजाआडFile Photo
Published on: 
Updated on: 

हुपरी : गुटखा व पानमसाल्याची चोरटी वाहतूक करणार्‍या व्यापार्‍यांवर पाळत ठेवायची, निर्जन रस्त्यांवर त्यांना आडवायचे, बनावट बंदूक व अन्य हत्यारांचा धाक दाखवून धमकवायचे आणि त्यांच्याकडील माल लुटून पसार व्हायचे अन्‌ हाच माल ओळखीच्या दुकानदारांना विकायचा अशा पद्धतीची लूट करून ऐष कराची, असा उद्योग करणार्‍या यळगूड व रेंदाळच्या टोळीला सदलगा पोलिसांनी बोरगावमधील काही युवकांच्या मदतीने गजाआड केले.

अकबर सायबाजी दरवेशी (वय २६, रा. रेंदाळ) आणि मोहसीन जमीर शेख (१९, रा. कागल, सध्या यळगूड) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणात रेणू आवटे, मलिक काळे, आदित्य आवटे (तिघेही रा. यळगुड) यांच्यासह आणखी काही साथीदारांची नावे समोर आल्याने लुटीच्या टोळीचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता आहे.

कर्नाटक सीमाभागातील बोरगाव-कसनाळ, आयको, पाचवा मैल व अक्कोळ या मार्गांवर रात्रीच्या वेळी गुटखा व पानमसाल्याची चोरटी वाहतूक सुरू असते. याचा गैरफायदा उठवत अशी वाहतूक करणार्‍या व्यापार्‍यांना निर्जन मार्गांवर अडवून हत्यारांचा धाक दाखवला जात होता. त्यानंतर व्यापार्‍यांकडील पानमसाला व गुटख्याचा माल जबरदस्तीने लुटून नेला जात होता. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने परिसरातील व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण होते.

यळगूड, रेंदाळ, कागल परिसरातील काही संशयित या प्रकारात सहभागी असल्याची चर्चा होती. या चोरट्यांना काही दुकानदारच पानमसाला वाहतूक करणार्‍या वाहनांची माहिती देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी संशयावरून अकबर दरवेशी व मोहसीन शेख यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या लूटप्रकारात रेणू आवटे, मलिक काळे, आदित्य आवटे (तिघेही रा. यळगूड) आणि मोहसीन शेख याचाही सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी लुटीच्या घटनांमध्ये वापरलेले हत्यार व दुचाकी ताब्यात घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.