Kolhapur Bribe Case : नागावमध्ये १२ हजारांची लाच घेताना दोघांना अटक

शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Kolhapur Bribe Case
नागावमध्ये १२ हजारांची लाच घेताना दोघांना अटक
Published on: 
Updated on: 

नागाव : नागाव (ता. हातकणंगले) येथे सामायिक जमिनीचे क्षेत्र दुरुस्त करून सातबारावर नाव नोंदवण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहाथ पकडले. अवधूत रामचंद्र लोंढे (३७) आणि सुरज कुंतीनाथ सोळांकुरे (४२, दोघेही रा. नागाव) अशी या लाचखोरांची नावे आहेत. याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागाव येथील एका तक्रारदाराच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर चुकीचे क्षेत्र नोंदवले गेले होते. हे क्षेत्र दुरुस्त करण्यासाठी त्यांनी हातकणंगले तहसीलमध्ये अर्ज केला होता. तिथून हे प्रकरण नागाव तलाठी कार्यालयात आले. तिथे विचारणा केली असता, ‘तलाठी मॅडमनी’ १५ हजार रुपयांची मागणी केल्याचे सांगत खासगी उमेदवार अवधूत लोंढे याने लाचेची मागणी केली. अखेर तडजोडीअंती १२ हजार रुपयांत सौदा ठरला.

मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून नागावमधील शिवाजी चौक परिसरात १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अवधूत लोंढे आणि सुरज सोळांकुरे यांना पंच साक्षीदारांसमक्ष रंगेहाथ पकडले. पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.