Burglary case | मध्य प्रदेशातील दोघांना ठोकल्या बेड्या

कागल, आष्ट्यात घरफोडी; 19 तोळे दागिन्यांसह 32 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त
 कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत घरफोडी करणार्‍या मध्य प्रदेशातील सराईत गुन्हेगारांना अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जप्त केला. यावेळी उपस्थित अधिकारी.
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत घरफोडी करणार्‍या मध्य प्रदेशातील सराईत गुन्हेगारांना अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जप्त केला. यावेळी उपस्थित अधिकारी.
Published on
Updated on

कोल्हापूर : कागलमध्ये दोन तर आष्टा (जि. सांगली) येथे घरफोडी करणार्‍या मध्य प्रदेशातील रेकॉर्डवरील दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून सुमारे 19 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 32 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पवन ऊर्फ आर्या रामदास मदोरिया (वय 42, रा. 125 ए ब्लॉक, खालसा चौक, इंदूर) आणि रोहितकुमार धनशाम पाल (35, रा. पांड्याखेडी मक्षी रोड, ठाणा चिमणगज मंडी, उज्जैन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या दोघांकडे चौकशी केली असता कागलमध्ये गतवर्षी घरफोडी करून साडेसात तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 9 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. यासह आष्टा, जि. सांगली येथेही यावर्षी रोख 20 हजार रुपयांसह 1 लाख 85 हजार रुपयांची घरफोडी केल्याची कबुली त्यांनी दिली. या तीनही घरफोडीतील लंपास झालेल्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे आदींनी मार्गदर्शन केले.

सापळा रचून ताब्यात

कागल येथील शिवनेरी पार्क मधील रफीक गौस सय्यद यांच्या घरी 14 एप्रिल रोजी भरदिवसा घरफोडी झाली होती. 11 तोळ्याच्या दागिन्यांसह एकूण 11 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. सीसीटीव्ही फुटेजद्वारे या प्रकरणाचा तपास सुरू होता. पोलिस अमलदार संजय कुंभार, महेश पाटील, महेश खोत, सागर माने आणि संदीप बेंद्रे यांना ही घरफोडी करणारे मध्य प्रदेशातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजले. यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला-मंगळवेढा रस्त्यावर वाडेगाव जवळ दि.14 मे रोजी पहाटे सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news