Mumbai-Pune Road Accident | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तिहेरी अपघात; कुंभोजच्या युवकाचा मृत्यू

टेम्पोच्या धडकेत दोघे गंभीर जखमी; वाहनांचा चक्काचूर
Mumbai-Pune Road Accident |
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तिहेरी अपघात; कुंभोजच्या युवकाचा मृत्यू
Published on: 
Updated on: 

कुंभोज : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाट हद्दीत खोपोली बाह्यमार्गाजवळ झालेल्या तिहेरी अपघातात कुंभोज येथील टेम्पोचा क्लिनर सूरज प्रकाश शिंदे (वय ३०, रा. पाण्याच्या टाकीजवळ) याचा मृत्यू झाला. तर अपघातात टेम्पो चालक संदीप कोळी (वय ३५) आणि वृषल पांडव (वय ३५, दोघेही रा. कुंभोज) गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात घडला.

याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आयशर टेम्पो (केए-५२ बी-५०८९) संदीप कोळी घेऊन पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करीत असताना बोरघाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. पुढे जात असलेल्या टेम्पोची (एम. एच. ५९ सी- ७५३३) पाठीमागून जोरदार धडक बसली. त्यानंतर टेम्पो रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला धडकला. या अपघातात दोन्ही टेम्पो उलटून केबिनचा चक्काचूर झाला. त्यामुळे चालक व क्लिनर केबिनमध्ये अडकून पडले. अपघाताची माहिती मिळताच बोरघाटचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल पाटील हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

दरग्यान, सूरज शिंदे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. संदीप कोळी याच्यावर एमजीएम रुग्णालयात, तर वृषल पांडव याच्यावर खोपोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान, मृत सूरज शिंदे याचा मृतदेह रविवारी (दि. २७) रात्री कुंभोज येथे आणण्यात आला. त्याच्या मागे आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news