Chhatrapati Sambhaji Maharaj | छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा

जन्मकाळ सोहळा, स्मारक स्वच्छता, रक्तदान शिबिरासह विविध उपक्रम
कोल्हापूर ः छत्रपती संभाजीराजे यांना अभिवादनप्रसंगी महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, सत्यजित कदम,  वैभव माने, आदिल फरास आदी.
कोल्हापूर ः छत्रपती संभाजीराजे यांना अभिवादनप्रसंगी महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, सत्यजित कदम, वैभव माने, आदिल फरास आदी. (छाया : मिलन मकानदार
Published on
Updated on

कोल्हापूर : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना त्यांच्या 369 व्या जयंतीदिनी तमाम जनतेने मानाचा मुजरा केला. गुरुवारी शंभूराजे जयंती सोहळा विविध उपक्रमांनी उत्साहात झाला.

जन्मकाळ पाळणा सोहळा

पापाची तिकटी येथील स्मारकाला अभिवादनानंतर जन्मकाळ सोहळ्याचा पाळणा झाला. यावेळी महापौर रूपाराणी निकम, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार मालोजीराजे, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, नगरसेविका दीपा ठाणेकर, माजी नगरसेवक ईश्वर परमार, अजित ठाणेकर, भाजपचे नेते महेश जाधव, नगरसेवक आदिल फरास आदी उपस्थित होते.

शहर-उपनगर व ग्रामीण भागात विविध उपक्रम झाले. संयुक्त शाहूपुरीतर्फे रक्तदान शिबीर, संयुक्त मंळवारपेठ राजर्षी शाहू तरुण मंडळ, छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ, धर्मवीर 14 बिंदू चौक यांच्यावतीने जन्मकाळ सोहळा, शंभूराजेंच्या प्रतिमेला अभिवादन यासह विविध उपक्रम राबविण्यात आले.

अखिल भारतीय मराठा महासंघ

जाधववाडी : अखिल भारतीय मराठा महासंघामार्फत रुईकर कॉलनीमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, बबनराव रानगे, दत्ताजी वारके, उदय देसाई, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले, रमेश आपटे तसेच महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

महापालिकेकडून अभिवादन

महापालिकेच्या वतीने रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम प्रमुख उपस्थित होते. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण सभापती कौसर भागवान, मुरलीधर जाधव, सहा.आयुक्त डॉ. विजय पाटील, नगरसेवक वैभव माने उपस्थित होते.

संयुक्त मंगळवार पेठ

संयुक्त मंगळवार पेठच्या वतीने मिरजकर तिकटी येथे पुष्कराज क्षीरसागर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी अजित तिवडे, बाबासाहेब पाटील, महेंद्र साळोखे, विनायक साळोखे, संपत जाधव, विकी पोलादे, सूरज साळोखे, हर्षल सुर्वे, बाबा पार्टे, सचिन पाटील, सुशांत चव्हाण आदी उपस्थित होते.

शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे स्मारक स्वच्छता

शिवशक्ती प्रतिष्ठानच्यावतीने रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक परिसरामध्ये स्वच्छता व आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. जुना भगवा ध्वज बदलून नवा फडकवण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले. यानंतर साखर-पेढे वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष साताप्पा कडव, प्रवीण कुरणे, साहिल पाटील, तुकाराम खराडे, अक्षय उलपे यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युद्धकलेतून मानवंदना

कोल्हापूर मर्दानी खेळ यांच्यावतीने लेझीम ताफ्यासह मिरवणूक व शंभू छत्रपतींच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना, रक्तदान शिबिर व शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके झाली. मर्दानी कला विशारद आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण केंद्रातर्फे मिरजकर तिकटी स्मारकाला अभिवादन आणि मर्दानी खेळांसह मिरवणूक काढण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news