Travel Bus Fire Accident | शॉर्टसर्किटने ट्रॅव्हल्स बस जळून खाक

रुईकर कॉलनी येथील घटना; ३५ लाखांचे नुकसान
Travel Bus Fire Accident |
Travel Bus Fire Accident | शॉर्टसर्किटने ट्रॅव्हल्स बस जळून खाक
Published on
Updated on

कोल्हापूर : शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीमध्ये खासगी ट्रॅव्हल्स बस जळून खाक झाली. सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास रुईकर कॉलनी येथील परख हॉटेलनजीक ही घटना घडली. यामध्ये बसचा कोच, केबीन, एसीसह ३० ते ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

वैभव रोड लाईन या कंपनीची ट्रॅव्हल्स बस (एमएच ०९ जीजे ९५४०) सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास जालना येथून कोल्हापुरात आली. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवासी सोडून चालक नितेश गुजले वाहकासह बस रुईकर कॉलनी येथील पार्किंगमध्ये लावण्यासाठी निघाला होता. दहा वाजण्याच्या सुमारास बस लिशां हॉटेल येथील सिग्नलपासून पुढे आली असता केबीनमधून धूर येत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. त्याने याची माहिती वाहकाला देऊन बस बाजूला घेऊन खाली उतरून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. चालक नितेशने याची माहिती अग्निशमन दलास तसेच ट्रॅव्हल्स मालकांना दिली. कावळा नाका येथील अग्निशमन दलाचे अधिकारी कांता बांदेकर, चालक उमेश जगताप, फायरमन उदय शिंदे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

डिझेल टँक फोडला

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चालकाने डिझेलचा टँक फोडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. डिझेल रस्त्यावर पसरल्यानंतर त्यावर पाणी आणि वाळू टाकून आग पसरण्यापासून थांबविल्याचे काही वाहनधारकांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news