Accident Case : कोल्हापूरच्या महिलेसह दोघींचा मृत्यू

एक्स्प्रेस वेवर ट्रेलरने 4 कारसह 6 वाहनांना चिरडले
Trailer crushes 6 vehicles including 4 cars on expressway
खोपोली : कोल्हापूरचे प्रवासी असलेल्या कारला ट्रेलरने असे चिरडल्याने चेंदामेंदा झालेल्या कारमधील दोन महिलांचा मृत्यू झाला.Pudhari File Photo
Published on
Updated on

खोपोली : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास खोपोली फूड मॉलजवळ मुंबई मार्गिकेवर एक भरधाव ट्रेलर दोन बससह चार कारला बेदरकार चिरडत गेल्याने झालेल्या या विचित्र आणि भीषण अपघातात स्विफ्ट कारमधील एक महिला आणि एक 17 वर्षांची तरुणी अशा दोघी जागीच ठार झाल्या असून स्विफ्ट कार व अन्य कारमधील सहाजण गंभीर जखमी झाले. जखमीत कोल्हापूरच्या पाचजणांचा समावेश आहे.

अपघातात मृत झालेल्या दोन महिलांमध्ये स्विफ्ट कारमधील अश्विनी अक्षय हळदणकर (38, रा. कोल्हापूर) आणि श्रीया संतोष अवताडे (17, मूळ रा. तासगाव-सांगली, सध्या रा. घाटकोपर) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये सारिका अवताडे (रा. घाटकोपर), वसुधा विजय जाधव (40), सारिका विजय जाधव (9), अविनाश विजय जाधव (3) आणि अक्षय हळदणकर हे सर्व कोल्हापूर येथील आहेत. जखमींना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर वाहतूकीची कोंडी झाल्याने अनेक वाहनांची रांग लागली होती, त्याचवेळी एक ट्रेलर पुण्याकडून भरधाव वेगाने आला. ट्रेलरने एक इर्टिगा कार, सियाझ कार, हुंडाई कार, एसटी बस आणि एका स्विफ्ट कारला मागून अत्यंत जोरदार धडक दिली. त्यामुळे ही स्विफ्ट कार त्यापुढे उभ्या असलेल्या खासगी बसखाली घुसली. या कारमधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले.

अपघात झाल्यानंतर बोराघाट पोलिस, आयआरबीची देवदूत यंत्रणा, हेल्प फाऊनडेशनची टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचली व जखमीना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प होती. पण काही वेळातच क्रेनच्या सहाय्याने अपघाताग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news