जोतिबा रस्त्यावर वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

पोलिस प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्था करण्याची स्थानिकांकडून मागणी
Traffic jam due to vehicle parking on Jotiba road
रविवारी जोतिबा रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडीPudhari Photo
Published on
Updated on

कासारवाडी, पुढारी वृत्तसेवा : टोप कासारवाडी येथून जोतिबाला जाणाऱ्या रस्त्यावर साई मंदिर येथे दुतर्फा वाहन पार्किंग केल्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. रविवार असल्याने जोतिबाला येणाऱ्या भाविकांची संख्या देखील जास्त प्रमाणात होती. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक तसेच भाविक हैराण झाले आहेत.

सादळे-मादळे मार्गे जोतिबा आणि पन्हाळ्याला जाण्यासाठी टोप-कासारवाडी येथून पर्यायी रस्ता आहे. कोल्हापूर शहराच्या बाहेरुन येणारे भाविक या रस्त्याचा वापर करतात. तसेच जवळच असणाऱ्या शिरोली औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या कामगारांची वर्दळही या मार्गावर प्रचंड आहे. तसेच येथून अवजड वाहनांचाही वाहतूक होत असते.

Traffic jam due to vehicle parking on Jotiba road
बाईक टॅक्सीमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर; रिक्षा-टॅक्सी चालकांचा तीव्र विरोध

या रस्त्याला असणाऱ्या मंगल कार्यालयाच्या बाहेर चार चाकी वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग केली होती. यामुळे येथून इतर वाहनांना वाहन चालवणे कठीण झाले आणि वाहतूक कोंडी झाली होती. दुचाकींना तर रस्ताच नव्हता. यामुळे वाहतूक पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन रविवारी या रस्त्याला वाहतूक कोंडी होऊ नये याची, व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहन चालक करत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news