child drowning accident | केर्ली येथे पाण्याने भरलेल्या टबात पडून चिमुकलीचा मृत्यू

child drowning accident |
child drowning accident | केर्ली येथे पाण्याने भरलेल्या टबात पडून चिमुकलीचा मृत्यू
Published on
Updated on

पोर्ले तर्फ ठाणे : केर्लेपैकी हनुमाननगर (ता. करवीर) येथील एका वीट भट्टीवर शुक्रवार, दि. 24 रोजी सकाळी नेहा रामा वडर (वय दीड वर्ष) या चिमुकलीचा पाण्याने भरलेल्या टबात पडून मृत्यू झाला. (child drowning accident)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील वीट भट्टीवर काम करणार्‍या रामा वडर (गब्बूर, जि. गुलबर्गा, कर्नाटक, सध्या रा. केर्लेपैकी हनुमाननगर) यांची मुलगी नेहाही खेळत होती. जवळच धुणे धुण्यासाठी मोठ्या प्लास्टिकच्या टबात काढलेल्या पाण्यात पडली. ही घटना तिच्या आई-वडिलांच्या लक्षात आल्यानंतर लगेच तिला बाहेर काढून बेशुद्ध अवस्थेत कोल्हापूरला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; पण डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news