kolhapur : वाघाचे कातडे जप्त; 11 जणांना अटक

कोल्हापूरसह रत्नागिरीत वन विभागाची कारवाई
Tiger Skin Seized; 11 People Arrested in Wildlife Crime Case
kolhapur : वाघाचे कातडे जप्त; 11 जणांना अटकPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : पुणे-बेंगलोर महामार्गावरील शिरोली एमआयडीसी येथे बिबट्याच्या कातडीची अवैध वाहतूक सुरू असताना कारवाई करून वन विभागाने दोन वाघांचे कातडे जप्त केले. 29 मार्च रोजी सकाळी 11 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी वन विभाग अधिकार्‍यांनी कोल्हापूरसह रत्नागिरी येथे ठिकठिकाणी कारवाई करून 11 जणांना अटक केली.

पांडू तात्या शिंदे (रा. मसुचीवाडी, इस्लामपूरजवळ) व शिवाजी सकपाळ (रा. पळशी, जि. सातारा) पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी नसरुद्दीन हबीब शेख (रा. चाकूर, जि. लातूर), समीर तातू तेजम (रा. माणगाव गोठोस, ता. कुडाळ), विजय विष्णू जमदाडे (रा. गोडोली, जि. सातारा), राकेश रमेश बांदेकर (रा. माणगाव गोठोस, ता. कुडाळ) यांना अटक करण्यात आली. त्यानंतर अधिक तपास करून शैलेश रघुनाथ इंदुलकर (रा. खेड, जि. रत्नागिरी), शिवाजी शंकर सपकाळ (रा. पळशी), जीवन भगवान तेजम (रा. चाफेली, ता. कुडाळ), रवी भगवान तेजम (रा. चाफेली, ता. कुडाळ), ईश्वरा चंदू नांगरे-पाटील ऊर्फ पांडू तात्या (रा. मसुचीवाडी), गजानन कृष्णा हळदे (रा. देवखिरकी, ता. गुहागर), पांडुरंग अंबाजी जाधव (रा. हेदवी, ता. गुहाघर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news