

कोल्हापूर : यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांचा प्रवास सुलभ होणार आहे. मध्य रेल्वेने 40 विशेष गाड्या सोडल्या आहेत, त्यापैकी तीन गाड्या कोल्हापुरातून सुटणार आहेत. कोल्हापुरातून सुटणार्या तीन गाड्यांच्या एकूण 160 फेर्या होणार आहेत.
कोल्हापूर-कटिहार मार्गावर 01405/01406 या क्रमांकाने 14 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत साप्ताहिक स्पेशल धावणार आहे. दर रविवारी सकाळी 9.36 वाजता कोल्हापुरातून सुटणारी ही रेल्वे कटिहार (बिहार) मध्ये मंगळवारी सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी पोहोचणार आहे. कटिहार येथून दर मंगळवारी सायंकाळी 6.10 वाजून सुटून दर गुरुवारी दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी कोल्हापुरात पोहोचणार आहे.
कोल्हापूर-मुंबई मार्गावर 01417 /01418 या क्रमांकाने 24 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत साप्ताहिक स्पेशल धावणार आहे. दर बुधवारी रात्री 10 वाजता कोल्हापुरातून सुटणारी ही गाडी मुंबईत दुसर्या दिवशी दुपारी दीड वाजता पोहोचणार आहे. दर गुरुवारी दुपारी अडीच वाजता मुंबईतून सुटणारी ही गाडी दर शुक्रवारी पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी कोल्हापुरात पोहोचणार आहे.
कोल्हापूर-कलबुर्गी मार्गावर 01209 /01210 या क्रमांकाने 29 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत शुक्रवार वगळता आठवड्यातील उर्वरित सर्व दिवस धावणार आहे. सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी कोल्हापुरातून सुटणारी ही गाडी कलबुर्गी दुपारी चार वाजून 10 मिनिटांनी पोहोचणार आहे. दररोज सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी कलबुर्गीतून सुटणारी ही गाडी दुसर्या दिवशी पहाटे 5 वाजून 40 मिनिटांनी कोल्हापुरात पोहोचणार आहे.