Kolhapur huts burned: राजेंद्रनगरात पूर्ववैमनस्यातून तीन झोपड्या पेटवल्या; एकावर गुन्हा

दत्त मंदिर परिसरातील घटना, सुदैवाने जीवितहानी नाही
Kolhapur huts burned
Kolhapur huts burned: राजेंद्रनगरात पूर्ववैमनस्यातून तीन झोपड्या पेटवल्या; एकावर गुन्हाPudhari
Published on
Updated on

कोल्हापूर : राजेंद्रनगरात शुक्रवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून तीन झोपड्या पेट्रोल टाकून पेटविण्यात आल्या. आगीमध्ये झोपड्या जळून खाक झाल्या, झोपड्यांमध्ये कोणी नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. येथील दत्त मंदिर परिसरात ही घटना घडली.

घटनास्थळी महापालिकेच्या प्रतिभानगर, टिंबर मार्केट, सासणे मैदान येथील अग्निशमनच्या बंबांनी आग अटोक्यात आणली. याप्रकरणी विष्णू बल्लाळ यांनी राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली. चंदर ऊर्फ पिंटू राजू लोंढे (वय 50, रा. राजेंद्रनगर) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

संशयित लोंढे याचे विष्णू बल्लाळ याच्यासोबत काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. मारहाणीत जखमी झालेल्या चंदरवर उपचारासाठी बल्लाळने खर्च देण्याचे ठरवून हा वाद मिटविला होता. याच पैशाच्या वादातून लोंढे याने बल्लाळ याची झोपडी पेट्रोल टाकून पेटवली. झोपडीत भंगारातील टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन पेटले. आग पसरत गेल्याने बाजूच्या पांडुरंग चौगुले, विठ्ठल चौगुले, गीता भोसले, सोपान रसाळ यांच्याही झोपड्या पेटल्या. त्यांच्या झोपड्यांचे व आतील साहित्याचे सुमारे दीड लाखांहून अधिक नुकसान झाल्याची तक्रार दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news