House Burglary Case | मित्राचे घर फोडून रोकड, दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यास बेड्या

बहिरेश्वर येथील घटना : दीड लाखाचा मुद्देमाल जप्त
House Burglary Case |
House Burglary Case | मित्राचे घर फोडून रोकड, दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यास बेड्या
Published on
Updated on

कोल्हापूर : शेतात पेरणीसाठी गेलेल्या मित्राचे घर फोडून रोकड, सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या बहिरेश्वर (ता.करवीर) येथील चोरट्याला करवीर पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या. वैभव विश्वास पडवळे (वय २९, रा. कमानीजवळ, माळवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून १ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. करवीर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत घरफोडीचा छडा लावला.

फिर्यादी संभाजी शिवाजी काशीद कुटुंबीयांसमवेत बहिरेश्वर, माळवाडी येथे राहतात. संशयित वैभव व संभाजी काशीद दोघेही एकमेकांचे जिवलग मित्र. गुरुवारी (दि. ४) सकाळी काशीद कुटुंबीय घराला कुलूप लावून शेतात पेरणीसाठी गेले होते. घरात कोणीही नसल्याची संधी साधून संशयित पडवळे याने काशीद यांचे घर भरदिवसा फोडले. घरातील तिजोरीतील रोकड, सोन्याचे झुबे, कानातील वेल, चांदीचे पैंजण असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला.

पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकरसह पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. गोपनिय माहितीनुसार वैभव पडवळे याच्या कृत्याचा पथकाला संशय आला. पोलिस त्याच्या मागावर होते. संशयित पडवळे हा चोरीच्या गुन्ह्यातील दागिने विक्री करण्यासाठी वाकरे फाटा येथून खुपिरेकडे जाणाऱ्या रोडवर संशयास्पद स्थितीत पोलिसांना आढळून आला. रणजित पाटील, सुभाष सरवडेकर, सुजय दावणे, विजय तळसकर यांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देत दीड लाखाचा ऐवज पोलिसांच्या स्वाधीन केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news