Kolhapur | दौलतवाडीत भला माेठा गवा विहिरीत पडला, बघ्‍यांची मोठी गर्दी!

प्रशासनाकडून गव्याला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्‍न
There is a stir in Daulatwadi as a Indian Bison falls into a well
दौलतवाडीत भला माेठा गवा रेडा विहिरीत पडल्याने खळबळ, बघ्‍यांची मोठी गर्दी!Pudhari Photo
Published on
Updated on

मुरगूड : पुढारी वृत्तसेवा; कागल तालुक्यातील दौलतवाडी येथे आज (शुक्रवार) सकाळी एक थरारक घटना घडली. गावाजवळील राजू गणपती कानडे यांच्या खोल विहिरीत तब्बल ६०० किलो वजनाचा गवा पडला. यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली. गव्याच्या गर्जनेसह लोकांची धावपळ सुरू झाली आणि पाहता-पाहता घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली.

गव्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाने व ग्रामस्थांनी तातडीने प्रयत्न सुरू केले, मात्र त्याच्या प्रचंड वजनामुळे हे काम कठीण बनले. अखेर वन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. क्रेन, दोरखंड आणि तज्ज्ञांच्या मदतीने गवा रेड्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे दौलतवाडीत या ठिकाणी बघ्‍यांची मोठी गर्दी झाली आहे. विहिरीतील पाण्यात अडकलेल्या गवारेड्याला पाहाण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. यामुळे संपूर्ण परिसर कुतूहलाचा विषय बनला आहे. प्रशासनाने गर्दी हटवण्याचे आवाहन केले असून, बचावकार्य अद्याप सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news