Ichalkaranji Theft Case | तीन लाख रोकडसह २२ तोळे दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

इचलकरंजीत भरवस्तीत चोरी
इचलकरंजी : चोरट्यांनी सय्यद यांच्या घरातील फोडलेली तिजोरी व विस्कटलेले साहित्य.
इचलकरंजी : चोरट्यांनी सय्यद यांच्या घरातील फोडलेली तिजोरी व विस्कटलेले साहित्य. (छाया : शौर्य जाधव)
Published on: 
Updated on: 

इचलकरंजी : घराच्या टेरेसच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्यांनी २२ तोळे सोन्याचे दागिने, ३ लाखांची रोकड असा तब्बल २० लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना लिगाडे मळा जवाहरनगर परिसरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याची फिर्याद आयुब ताजुद्दीन सय्यद (वय ५७, रा. लिगाडे मळा) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे.

आयुब सय्यद यांचे सायकल दुकान आहे. ते जवाहरनगरातील लिगाडे मळा येथे कुटुंबासह राहण्यास आहेत. त्यांच्या पत्नीचा अपघात झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याने सर्व कुटुंबिय त्यांना आणण्यासाठी सायंकाळी दवाखान्यात गेले होते. त्यामुळे घरीच कोणीच नव्हते. ही संधी साधत चोरट्यांनी टेरेसवरील उघड्या दारातून घरात प्रवेश केला. बेडरूममधील तिजोरी उचकटून लॉकरमधील २ लाख ८० हजारांच्या २० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चेन, १ लाख ४० हजारांचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, १४०० रुपयांचे २ ग्रॅमचे सोन्याच्या रिंगा, १ लाख ५ हजारांची प्रत्येकी १ ग्रॅम वजनाची १५ सोन्याची नाणी आणि 3 लाखांची रोकड लांबवली. दोन तासांनंतर सय्यद कुटुंबिय घरी परतताच चोरीची घटना उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच श्वान पथकासह ठसेतज्ज्ञांनाही पोलिसांनी पाचारण केले होते. एका पेक्षा अधिक चोरटे असावेत, असा पोलिसांना कयास आहे. चोरट्यांनी तीन लाखांची रोकड लांबवली असली तरी दहा रुपयांच्या ७ बंडलना मात्र त्यांनी हात लावला नाही. अधिक तपास उपनिरीक्षक प्रवीण साने करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news