

कोल्हापूर : ओळखीचा फायदा घेत युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नाट्य कलावंत अनुपम मनोहर दाभाडे (वय 35, रा. व्यंकटेश रेसिडेन्सी, इंगळेनगर) याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. संशयिताने व्हिडीओ करून पीडितेला धमकावल्याचेही निष्पन्न झाले आहे.
दोघेही नाट्य कलावंत असल्याने एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सप्टेंबर 2024 ते जून 2025 या काळात संशयिताने आपल्या फ्लॅटवर वेळोवेळी अत्याचार केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. संशयिताला अटक केल्याचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले.