

कोल्हापूर ः सोने-चांदीचे दर जागतिक घडामोडींच्या प्रभावाने पुन्हा वाढायला लागले असून सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर पुन्हा 80 हजारांच्या पार गेला आहे. गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 80,200 प्रति 10 ग्रॅम होता; तर चांदीचा दर 95,700 प्रति किलो होता.
जीएसटीशिवाय सोन्याचा दर 77,870 प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 92,910 प्रतिकिलो नोंदवला गेला. वायदे बाजारातील सोन्याच्या दरातही गुरुवारी चांगली वाढ नोंदवली गेली आहे. आठवड्यात सोन्याच्या दरात 2,200 रुपये प्रति 10 ग्रॅमची तर चांदीच्या दरात 3,300 रुपये प्रति किलोची वाढ झाली आहे.