

- मनोज सांगळे
प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. ते समाजकार्य आणि दानशूरतेसाठी ओळखले जात होते. ते नेहमीच शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित कार्यासाठी निधी देत असत. (Rata Tata Passed Away)
सर्वसामान्य कुटुंबाला कारमधून प्रवास करता यावा यासाठी जगातील सर्वात स्वस्त नॅनो कार रतन टाटा यांनी बाजारात आणली आणि जगभर ते प्रकाशझोतात आले होते. रतन टाटा मुंबईमधील ज्या बॉम्बे हाऊसमध्ये राहत त्या इमारतीला ऐतिहासिक महत्त्व असून एकेकाळी या इमारतीमध्ये टाटा समूहाचे मुख्यालय होते.
सध्या ही संपूर्ण इमारत रतन टाटांच्या मालकीची आहे. या घराची किंमत २०० कोटींवर गेली असून त्यांनी ते २०१५ साली विकत घेतले होते. कुलाबा पोस्ट ऑफिसच्या समोर असलेल्या त्यांचा बंगल्यामधून समुद्र दिसतो. या बंगल्याचे सात मुख्य भाग आहेत.
रतन टाटा यांना गाड्यांची विशेष आवड होती. त्यांच्याकडे लक्झरी गाड्या, त्यांचे स्वतःचे खासगी दसॉल्ट फाल्कन २००० जेट विमान आहे. या विमानाची किंमत २२ मिलियन अमेरिकन डॉलर (१६८ कोटींहून अधिक) आहे.
एका सर्वेक्षणात २०२२ मध्ये रतन टाटा यांची निव्वळ संपत्ती ३८०० कोटी रुपये असल्याचे म्हटले होते. जगातील ते ४२१ वे श्रीमंत या सर्वे आधारे ठरले होते. रतन टाटा यांच्याच नेतृत्वाखाली टाटा ग्रुपने मिळवलेले यश टाटा मोटर्सची नोंद एनवायएसमध्ये (न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज) झाली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सार्वजनिक झाली. टाटा चहा कंपनीने टेटली ही जगप्रसिद्ध कंपनी विकत घेतली.
जॅग्वॉर लैंड रोव्हर घेण्याचे धाडस टाटा मोटर्सने रतन टाटा यांच्यामुळेच दाखवले. १०० पेक्षा जास्त देशांमध्ये होते कंपनीच्या प्रॉडक्टची विक्री. रतन टाटा यांचे वडील नवल टाटा हे नवाजबाई टाटा आणि रतनजी टाटा यांचे दत्तक पुत्र होते. रतन टाटा हे १० वर्षांचे असताना त्यांच्या आई- वडिलांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर १९४० पासून रतन टाटा यांच्या आजीनेच त्यांचा सांभाळ केला.
टाटा स्टील्समध्ये रतन टाटा यांना पहिल्यांदा नोकरी मिळाली तेव्हा चूनखडी आणि स्फोट भट्टीची जबाबदारी देण्यात आली होती. १९६१ साली त्यांनी टाटा कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. हार्वर्ड बिझिनेस स्कूलमधील एका इमारतीला रतन टाटा यांचे नाव देण्यात आलेलं आहे. २००७ साली रतन टाटा हे पहिले सामान्य भारतीय ठरले होते ज्यांनी एफ-१६ फाल्कन हे विमान उडवले होते. एका अमेरिकन वैमानिकाबरोबर सहवैमानिक म्हणून रतन टाटांनी ४० मिनिटं हे विमान उडवलं होतं. हा कारनामा त्यांनी अरो इंडिया शोमध्ये केला होता.
रतन टाटा यांनी कष्ट आणि श्रम करून संपत्ती कमावली. टाटा कंपनीचा आवाका आणि व्याप्ती वाढवण्यात रतन टाटा यांचा मोलाचा वाटा आहे. रतन टाटा यांनी आठवीपर्यंतचे शालेय शिक्षण कॅम्पियन स्कूलमध्ये केले. त्यानंतर त्यांनी शिमला येथून पुढील शिक्षण पूर्ण केलं.
न्यूयॉर्कमधील रिव्हरडेल कंट्री स्कूल येथून रतन टाटा यांनी १९५५ साली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठमधील बिझनेस स्कूलमध्ये सात आठवड्यांचा अॅडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर १९५९ साली त्यांनी स्थापत्यशास्त्रामध्ये कॉर्नेल विद्यापीठातून पदवी संपादन केली.
१९६२ साली रतन टाटा हे आयबीएम या मोठ्या कंपनीतील नोकरीला नकार देत भारतात परतले होते. जेआरडी टाटा यांच्या सल्ल्यानंतर टाटा ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. रतन टाटा यांनी जमशेदपूर येथील कारखान्यामध्ये वरिष्ठ कर्मचाऱ्यांबरोबर काम करण्यासाठी पाठवण्यात आलं. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखालीच टाटा कंपन्यांचा नफा महसुलाच्या ५० टक्क्यांपर्यंत आणि एकंदरीत ४० टक्क्यांनी वाढला होता.
१९७० च्या दशकात रतन टाटा यांना टाटा समूहात व्यवस्थापकीय पद देण्यात आले. नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स (NELCO) ची उपकंपनी टाटाकडे वळवून त्यांनी सुरुवातीचे यश संपादन केले होते. सुरुवातीला, टाटांना विविध उपकंपन्यांच्या प्रमुखांकडून तीव्र प्रतिकाराचा सामना करावा लागला,
नंतर त्यांनी टाटा समूहाचा ब्रँड तयार करण्यासाठी सहाय्यक कंपन्यांना त्यांच्या नफ्यात योगदान देणे आवश्यक अशा अनेक धोरणांची अंमलबजावणी केली. टाटांनी नवनिर्मितीला प्राधान्य दिले आणि तरुण प्रतिभांवर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली, उपकंपन्यांमधील ओव्हरलॅपिंग ऑपरेशन्स कंपनी-व्यापी ऑपरेशन्समध्ये सुव्यवस्थित करण्यात आल्या, समूहाने जागतिकीकरणासाठी असंबंधित व्यवसाय सोडले होते.