कुटुंबाची नावे मतदार यादीत एकत्र येणार

निवडणूक आयोगाचे आदेश : 'विधानसभा' पार्श्वभूमीवर काम सुरू
Voting
कुटुंबाची नावे मतदार यादीत एकत्र येणार Pudhari Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : एकाच कुटुंबातील सर्व मतदारांची नावे आता मतदार यादीत एकत्र क्रमाने येणार आहेत. त्यानुसार मतदार यादीत नावांचा समावेश करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून सध्या हे काम सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत एकाच कुटुंबातील काही सदस्यांची एकत्र नावे, तर काहींची अन्यत्र नावे होती. काहींचे मतदान एका केंद्रांवर तर काहींचे मतदान दुसऱ्याच केंद्रांवर असेही प्रकार झाले. यामुळे काहीजण मतदानालाही मुकले. काहींनी मतदान करण्याचेही टाळले. यामुळे मतदानावेळी वादाचेही प्रसंग घडले.

पुरवणी मतदार यादीत नाव समाविष्ट झालेल्या विशेषतः नव मतदारांची नावे वेगळ्याच ठिकाणी असतात, मतदानावेळी कुटुंबासमवेत एकत्र आल्यास ती शोधताना अडचणीही येत असतात. अनेकदा नावे आढळून येत नसल्याचेही मतदान न करता मतदार परत आल्याचेही प्रकार घडले आहेत.

यासर्व पार्श्वभूमीवर मतदार यादीत कुटुंबातील सर्वच मतदारांची नावे एकाच क्रमाने, एकाच ठिकाणी यावी याकरिता विधानसभा मतदार संघासाठी प्रसिद्ध केल्या जाणारी मतदार यादी बिनचूक करण्यात येत आहे. याकरिता कुटुंबातील सर्वांची नावे एका क्रमाने मतदार यादीत समाविष्ट केली जाणार आहेत. त्याचे काम सध्या सुरू आहे.

दि. २५ जुलैला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय प्रारूप मतदार यादी दि. २५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. या मतदार यादीवर हरकती व सूचना करता येणार आहेत. मतदारांना मतदार यादीतून नाव वगळणी, नाव समाविष्ट करणे आदींसह अन्य दुरुस्ती करता येणार आहेत. यानंतर दि. २० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news