

कोल्हापूर : सर्व मतभेद विसरून एकत्र येत असतील तर चांगलेच आहे. राजकारणामध्ये कधीही मतभेद विसरून एकत्र येऊन चांगले काम करणे हिताचे असते, असे शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या ऐक्याबाबत शुक्रवारी (दि.२७) पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्यात ज्या विचाराचे सरकार सत्तेत बसले आहे ते लोकशाहीला पूरक नाही. विरोधकांना डावलले जात असल्याचा आरोप करून योग्य वेळी जनतेसमोर आपली भूमिका मांडण्यात येईल, असेही पवार म्हणाले.
पवार गुरुवारपासून दोन दिवस कोल्हापूर दौर्यावर होते. येथून रवाना होण्यापुर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ठाकरे बंधु एकत्र येत असतील तर चांगलेच आहे. परंतू ते एकत्र येतील की नाही हे सांगायला मी ज्योतिषी नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विचारले असता, पवार यांनी सर्व मतभेद विसरून एकत्र येऊन चांगल काम करणार असतील तर आनंदच असल्याचे सांगून नेहमी प्रमाणे गुगली टाकली आहे.
हिंदी भाषेवरून सुरू असेलल्या वादावर बोलताना पवार म्हणाले, हिंदी आवश्यक आहे परंतू "पहिली ते चौथी पर्यंत हिंदी लादणे किंवा सक्तीचे करणे योग्य नाही. पाचवी नंतर विचार करावा. कारण हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही. मात्र स्थानिक भाषांचा आदर राखला पाहिजे. त्यामुळे लहान मुलांवर हिंदी लादू नये.
शक्तीपीठ महामार्गाबाबत बोलताना पवार म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकर्यांची भूमिका, सरकारची भूमिका या प्रकल्पाच्या अनुकूल आणि प्रतिकुल या दोन्ही बाजू समजाऊन घेण्याची आवश्यकता आहे. याबाबत अर्थ विभागाने खर्चाचा मुद्दा उपस्थित केला असेल तर त्याचा देखील अभ्यास केला पाहिजे. त्या नंतर याबाबत मत व्यक्त करणे योग्य होईल. समृद्धी महामार्गामुळे संबंधीत गावांचा विकास झाला की नाही, हे आता लगेच सांगता येणार नाही, परंतू या महामार्गावरील अपघाताची संख्या मात्र वाढत असल्याने ही चिंतेची बाब आहे.
सीमा प्रश्नासंदर्भात नुकतीच एक समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा समावेश आहे. सीमावादा संदर्भातील जबाबदारी आ. पाटील यांच्याकडे द्यावी अशी महाराष्ट्र एकिकरण समितीचे म्हणणे आहे. त्यांचे शिष्टमंडळ सकाळी भेटले. यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी लवकरच बोलणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
जनसुरक्षा विधेयकावर बोलताना पवार म्हणाले, जनसुरक्षा विधेयकाविषयी शंका उपस्थित करण्यात येत आहे. "सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांमध्ये या विधेयकाबाबत अस्वस्थता आहे. जुजबी कारणानी कोणालाही अटक करण्याचे अधिकार सरकारला आहेत. त्यामुळे या विधेयकात दुरुस्तीची आवश्यकता आहे. या दुरस्ती केल्यास या विधेयकाला आपला पाठिंबा राहील.
जनसुरक्षा विधेयकावर बोलताना पवार म्हणाले, जनसुरक्षा विधेयकाविषयी शंका उपस्थित करण्यात येत आहे. "सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांमध्ये या विधेयकाबाबत अस्वस्थता आहे. जुजबी कारणानी कोणालाही अटक करण्याचे अधिकार सरकारला आहेत. त्यामुळे या विधेयकात दुरुस्तीची आवश्यकता आहे. या दुरस्ती केल्यास या विधेयकाला आपला पाठिंबा राहील.
राज्यात ज्या विचाराचे सरकार सत्तेत बसले आहे त्या सरकारची दिशा लोकशाहीला पूरक नाही. विरोधकांना डावलले जाते,"असे सांगून पुणे रेल्वे स्टेशनला नाव देण्यावरून सुरू असलेल्या वादावार बोलताना पवार म्हणाले, नावावरून समाजामध्ये अंतर कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याचा मुद्दा कोठून आला? छत्रपती संभाजी महाराज यांचाही त्याग होता. मात्र विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकर्याचा ३० टक्के उत्पादन खर्च कमी होणार आहे आणि ३० टक्के उत्पादन वाढणार आहे असल्याचे सांगून पवार मोदींसोबत इस्रायल दौऱ्याची आठवण सांगताना म्हणाले, कृषीमंत्री असताना नरेंद्र मोदींना इस्रायलमध्ये घेऊन गेलो होतो. त्या देशात सहसा व्हिसा मिळत नाही, मात्र त्यांनी विनंती केल्यावर मी पंतप्रधानांशी बोलून त्यांच्यासाठी सोय केली."