Textile Export Facilitation Center Approval | वस्त्रनगरीला नवा मान, निर्यातीत विशेष स्थान!

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून इचलकरंजीत टेक्स्टाईल एक्स्पोर्ट फॅसिलिटेशन सेंटरला मंजुरी
Textile Export Facilitation Center Approval |
Textile Export Facilitation Center Approval | वस्त्रनगरीला नवा मान, निर्यातीत विशेष स्थान!
Published on
Updated on

इचलकरंजी : कापड उद्योगाला अधिक निर्यातक्षम बनवण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वस्त्र समितीने देशात सहा ठिकाणी टेक्स्टाईल एक्सपोर्ट फॅसिलिटेशन सेंटर (टीईएफसी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये इचलकरंजीचा समावेश आहे. लुधियाना, करूर, सुरत, जयपूर आणि वाराणसी या शहरांसह इचलकरंजीतही हे केंद्र सुरू होणार असल्याची माहिती टेक्स्टाईल कमिटी इचलकरंजी केंद्राचे कार्यालय प्रमुख शिवराज मार्गम यांनी दिली.

इचलकरंजी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे वस्त्रोद्योग केंद्र आहे. त्यामुळे येथील उत्पादने अधिक प्रमाणात निर्यात व्हावीत, या उद्देशाने केंद्र सरकारने येथे टीईएफसी केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. देशातील विविध भागांमध्ये तयार होणार्‍या कापड उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी प्रत्येक केंद्रातून विशिष्ट उत्पादनांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

टेक्स्टाईल कमिटीच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राला गुणवत्ता मूल्यांकन, निर्यात प्रमाणन, प्रयोगशाळा चाचणी, आयएसओ सल्लागार सेवा, बाजार संशोधन तसेच विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाते. नव्याने सुरू होणार्‍या टीईएफसीच्या माध्यमातून प्रशिक्षण व क्षमता विकास कार्यक्रम, निर्यात वर्गीकरणाविषयी मार्गदर्शन, निर्यात रोडमॅप तयार करण्यास मदत, आयात-निर्यात शुल्क व फ्री ट्रेड अ‍ॅग्रीमेंटस्ची माहिती तसेच विविध देशांच्या तांत्रिक नियमांविषयी मार्गदर्शन दिले जाणार आहे. यामुळे स्थानिक वस्त्रोद्योगाला निर्यात क्षेत्रात नवी संधी उपलब्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news