Ichalkaranji Tension | साऊंड सिस्टीम बंद केल्याने इचलकरंजीत तणाव

Ichalkaranji Tension |
Ichalkaranji Tension | साऊंड सिस्टीम बंद केल्याने इचलकरंजीत तणाव
Published on
Updated on

इचलकरंजी : गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान साऊंड सिस्टीम बंद केल्याच्या कारणावरून शहरातील गणेशनगर परिसरात सोमवारी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशनगर गल्ली क्रमांक चारमधील शिवा ग्रुप गणेश मंडळाची मिरवणूक सुरू असताना पोलिसांनी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सांगत साऊंड सिस्टीम बंद केली. यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांसह मंडळाचे कार्यकर्ते व महिलांनी रस्त्यावर ठिय्या देत पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला.

यावेळी नगरसेवक योगेश पाटील, राजू चव्हाण, प्रसाद इंगवले यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. साऊंड सिस्टीम बंद करण्याऐवजी नियमांच्या चौकटीत वाजविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. दरम्यान, पोलिस प्रशासनाने नगरसेवकांच्या विनंतीनंतर साऊंड सिस्टीम सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, त्यानंतर पोलिसांकडून मिरवणुकीचे व्हिडीओ चित्रीकरण सुरू करण्यात आल्याने पुन्हा काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. दरम्यान, गणेशोत्सवादरम्यान शहरातील अन्य काही भागांतही साऊंड सिस्टीम व मिरवणुकीच्या नियमांवरून काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news