kolhapur | पंढरपुरात करचोरीचा घाट; व्यापार्‍याला कळंब्याची वाट

बनावट ‘आयटीसी’द्वारे 14.31 कोटींची फसवणूक उघड
kolhapur |
kolhapur | पंढरपुरात करचोरीचा घाट; व्यापार्‍याला कळंब्याची वाट
Published on
Updated on

कोल्हापूर : वस्तू किंवा सेवांचा कोणताही प्रत्यक्ष पुरवठा न करता केवळ कागदोपत्री व्यवहार दाखवून सुमारे 14 कोटी 31 लाख रुपयांचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मिळवल्याप्रकरणी केंद्रीय जीएसटीच्या कोल्हापूर प्रादेशिक युनिटने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी पंढरपूर येथील मे. विमल एंटरप्रायझेसचा मालक समाधान हनुमंत घाडगे (वय 44) याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ऑक्टोबर 2025 मध्ये उघडकीस आलेल्या कोट्यवधीच्या जीएसटी घोटाळ्यात घाडगे याचा सहभाग निष्पन्न झाला होता. तेव्हापासून जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालय त्याच्या मागावर होते. अटकेच्या भीतीने तो फरार होता; मात्र कोल्हापूरच्या पथकाने शिताफीने त्याला बेड्या ठोकल्या. घाडगे हा मे. विमल अ‍ॅग्रो कंपनीचा चालक म्हणूनही कार्यरत होता. वरिष्ठ गुप्तचर अधिकारी अभिजित भिसे, सौरभ पवार आणि अतुल कुमार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

घोटाळ्याचे स्वरूप

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, घाडगे याने स्वतः 14 कोटी 31 लाखांचा बनावट ‘आयटीसी’ वापरलाच; शिवाय इतर व्यावसायिकांनाही कोणताही माल न पुरवता 8 कोटी 44 लाखांचा बेकायदेशीर टॅक्स क्रेडिटचा लाभ मिळवून दिला. या कटात त्याला मयंक मुकेश पटेल याने मदत केली होती, ज्याला सप्टेंबर 2025 मध्येच अटक करण्यात आली आहे, असे भिसे यांनी सांगितले. दरम्यान, संशयित समाधान घाडगे याची रवानगी सध्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news