Tawade Hotel encroachment | तावडे हॉटेल परिसर जागा मनपाचीच

बेकायदेशीर ​बांधकाममालकांकडून हद्द मान्य; २१ सप्टेंबरला सुनावणी
Tawade Hotel encroachment |
Tawade Hotel encroachment | तावडे हॉटेल परिसर जागा मनपाचीच
Published on
Updated on

कोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरातील संबंधित जागा महापालिकेच्याच हद्दीत असल्याचे प्रतिज्ञापत्र बांधकामधारकांनी न्यायालयात सादर केल्याने प्रदीर्घ काळापासून सुरू असलेला हद्दीचा वाद संपुष्टात आला. कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये न्यायमूर्ती शर्मिला देशमुख आणि न्यायमूर्ती निरज धोते यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी (दि. २७) सुनावणी झाली. या प्रकरणातील जनहित याचिकेसह अन्य मुद्द्यांवर पुढील सुनावणी २१ सप्टेंबर रोजी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिकेने या परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. या कारवाईविरोधात बांधकामधारकांनी सर्किट बेंचसह राज्य शासनाकडे धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान बांधकामधारकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, हद्दीचा वाद मिटला असून बांधकामे नियमितीकरणाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे.

यामध्ये २०१८ ची मुदत गृहीत न धरता २०२६ पर्यंत झालेली सर्वच बांधकामे नियमित करावीत, अशी सुधारित मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. महापालिका २०१८ पूर्वीच्या बांधकामांवर विचार करणार असली, तरी सरसकट सर्व बांधकामांना संरक्षण मिळावे, असा प्रयत्न सुरू आहे. ​दरम्यान, सर्व बांधकामे नियमित करायची की नाही, याचा चेंडू आता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news