बांबवडे : पुढारी वृत्तसेवा : बदलत्या आणि गतिशील स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी शिक्षणाने समृद्ध आणि सशक्त पिढी निर्माण होण्याची गरज आहे. यासाठी विविध स्पर्धा परीक्षांचे मार्ग खुणावत असतात. यामध्ये 'दै. पुढारी' सारख्या अग्रगण्य माध्यम समूहाने 'टॅलेंट सर्च एक्झाम' उपक्रमाच्या माध्यमातून शालेय स्तरावरील मुलांमधील सुप्त गुणांना चालना देण्याचे कौतुकास्पद काम हाती घेतले आहे, असे गौरवोद्गार खुटाळे उद्योग समूहाचे प्रमुख, बांबवडे ग्रामीण पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब खुटाळे यांनी काढले. (Pudhari Talent Search Exam)
स्पर्धा परीक्षा धर्तीवर घेण्यात आलेल्या 'पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम'मध्ये शाहूवाडी तालुक्यातील गुणानुक्रमे सर्वोत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बांबवडे ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या आण्णासाहेब खुटाळे सभागृहात शनिवारी (ता. २१) हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला बांबवडे केंद्रप्रमुख सदाशिव थोरात हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. (Pudhari Talent Search Exam)
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत वितरण विभागाचे प्रतिनिधी शशांक पाटील यांनी केले. बांबवडे प्रतिनिधी आनंदा केसरे यांनी कार्यक्रमाचे स्वरूप विशद केले. शाहूवाडी तालुक्यातील परीक्षा आयोजनात गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांचे विशेष मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगितले.
यावेळी पुढारी टॅलेंट सर्च एक्झामसाठी तज्ज्ञांच्या टीमने तयार केलेल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप दर्जेदार होते. शाहूवाडी सारख्या डोंगराळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना या परीक्षेचे विशेष आकर्षण असून यापुढेही विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग राहील, असा आशावाद प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख सदाशिव थोरात यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. 'दै. पुढारी'च्या उपक्रमाप्रमाणे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात योग्य मार्गदर्शन लाभल्यास युवापिढी नक्कीच यशाच्या मार्गावर धावेल, असा विश्वास व्यक्त करणाऱ्या अनेक पालकांनी दै. पुढारीवर कौतुकाचा वर्षाव केला. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते परीक्षेत गट निहाय प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शील्ड आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी 'रयत'चे निवृत्त मुख्याध्यापक पी. डी. दळवी (सरूड), बांबवडे पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक सागर कांबळे, अमर पाटील (साळशी), सचिन जाधव (परखंदळे), जयशंकर जवादे (शाहूवाडी), अंबादास जाधव (आंबर्डे), राहुल सातपुते (सरूड), अंक विक्रेते दिपक लाटकर, सुरेश कापसे, पुढारी प्रतिनिधी राजाराम कुलकर्णी आदी मान्यवरांसह विद्यार्थी पालक आदी उपस्थित होते. सरूड परिसर वार्ताहर चंद्रकांत मूदूगडे यांनी आभार मानले.
राजलक्ष्मी प्रशांत केकण (मलकापूर), कृष्णाली जयवंत सांगावकर (बांबवडे), प्रज्वल अंबादास जाधव (आंबर्डे), आर्यन शिवाजी अस्वले (आंबर्डे), वैष्णवी मधुकर पाटील (साळशी), संस्कृती महादेव पाटील (परखंदळे), शृतिका पांडुरंग पाटील (श्रीनिधी संदीप मगदूम), प्रथमेश सचिन जाधव (परखंदळे), अंजली दिलीप मोरे (येळाणे), आराध्या राहुल सातपुते (सरूड), श्रेयस ज्योतिराम दळवी (सरूड), आयुष अमर पाटील (साळशी), उत्कर्ष बाबासाहेब पोवार (शाहूवाडी), स्वराज सागर शेळके (चरण), कार्तिक दिलीप कलकुटगी (मलकापूर), चैतन्य जयशंकर जवादे (शाहूवाडी), धैर्यशील दीपक पाटील (मलकापूर), हर्षद सागर थोरात (साळशी), श्रुतिका श्रीकांत दळवी (परखंदळे)