Kolhapur jewellery robbery | टाकाळा परिसरात बंगला, हॉस्पिटलमधून 22.88 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

Kolhapur jewellery robbery
Takala theft case | टाकाळा परिसरात बंगला, हॉस्पिटलमधून 22.88 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
Published on
Updated on

कोल्हापूर : राजारामपुरी, टाकाळा परिसरात डॉ. रमेश निगडे यांच्या श्रीराम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसह बंगल्यातून 22 लाख 88 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे व रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी उघडकीला आली. सफाई महिला कामगार शबाना अरब (वय 38, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) हिच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

जून 2025 ते दि. 7 एप्रिल 2026 काळात हा प्रकार घडल्याचे स्नेहा रमेश निगडे (64, रा. टाकाळा, कोल्हापूर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. संशयित महिलेने वेळोवेळी 4 लाख 86 हजार रु. किमतीची चांदीची दोन ताटे, चांदीचे ग्लास, चमचे, बाऊल, करंडा, लक्ष्मी, गणपतीचे क्वाईन, हळद, कुंकवाचे करंड, ताम्रपळी, पंचपात्र, समईसह 18 लाख रुपये किमतीचे सोन्याच्या 12 अंगठ्या, लहान मुलांचे ब—ेसलेट, सोन्याच्या तीन साखळ्या, लहान मुलाची सोनसाखळी, दोन नग मंगळसुत्र, कानातील टॉप्स याशिवाय डॉ. मंगेश लाड यांच्या खिशातून 2 हजारांची रोकड लंपास करण्यात आल्याचे म्हटले आहे. संशयित महिला निगडे यांच्याकडे दीड वर्षापासून सफाई कामगार म्हणून कामाला आहे. विश्वासाचा गैरफायदा घेऊन बंगला आणि हॉस्पिटलमधून वेळोवेळी सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याचा संशय आहे. पोलिस निरीक्षक सतीश होडगर, उपनिरीक्षक रूपेश इंगळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. संशयित महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news