

निपाणी : शहराबाहेरील आंदोलननगर येथील स्वामी समर्थ मंदिर येथे प्रकट दिन सोहळ्याला मंगळवारी दत्तयाग होमने प्रारंभ झाला. दरम्यान बुधवार दि. १८ रोजी स. ७ वा. मंदिराचे पुजारी सुरेश संकपाळ यांच्याहस्ते श्री मूर्तीची पूजा महाअभिषेक व महाआरती झाल्यानंतर सकाळी ८:३० ते १०:३० यावेळेत युवराज सुतार यांच्या अधिष्ठानाखाली श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पारायण पार पडले. यावेळी पारायण सोहळ्यास २०० महिलांनी सहभाग दर्शविला. दरम्यान उद्या शुक्रवार दि. २० रोजी महाप्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून दुपारी महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
दरम्यान बुधवारी सायंकाळपासून रात्री उशीरापर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांचा भव्य पालखी सोहळा व शोभा यात्रेचे आयोजन मंदिर कमिटीच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी शहराच्या मध्यवर्ती भागातील श्रीराम मंदिर पासून या शोभा यात्रेला सुरुवात झाली. हा पालखी सोहळा शहरातील प्रमुख मार्गावरून नगर प्रदक्षिणा करून मंदिरामध्ये पालखी आल्यानंतर महाआरती झाली.
उद्या शुक्रवारी (दि.20) प्रकट दिनानिमित्त पहाटे ५ वा. अवधूत सामानगडकर-चिखली व पुजारी सुरेश संकपाळ यांच्या अधिपत्याखाली महाअभिषेक व पूजा पार पडणार असून त्यानंतर महाआरती होणार आहे. दु. १२ वा.महाप्रसाद होणार आहे. तर सायंकाळी ६ वा. श्री स्वामी सेवेकरी यांचा स्वामीमय भक्ती संगीताचा कार्यक्रमाने या उत्सवाची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे.