हातकणंगलेत स्वाभिमानीला धक्का

माजी पं.स. सभापती राजेश पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
Kolhapur News |
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेश पाटील यांच्या गळ्यात शिवसेनेचा भगवा स्कार्प घालून स्वागत केले. Pudhari Photo
Published on
Updated on

हातकणंगले : हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती आणि स्वाभिमानीचे तालुक्यातील नेते राजेश पाटील यांनी गुरूवारी शिवसेनेत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेश पाटील यांच्या गळ्यात शिवसेनेचा भगवा स्कार्प घालून स्वागत केले.

यावेळी खा. धैर्यशील माने यांच्यासह शिवसेनेचे तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. राजेश पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिंदे यांना बळ मिळालेले आहे. भविष्यात त्यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी सोपविण्याचीही शक्यता आहे.

स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून पक्षबांधणीचे काम हातात घेतले आहे. यासाठी खा. धैर्यशील माने आणि जिल्हा शिवसेना प्रमुख रविंद्र माने यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्याची मोठी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. राजेश पाटील यांच्या रूपाने याची सुरूवात झाल्याचे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news