Supriya Sule | गोकुळबाबतही ‘वॉशिंग मशिन’ होऊ नये

खा. सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य; मुख्यमंत्र्यांकडून पारदर्शक चौकशीची अपेक्षा
Supriya Sule
Supriya SulePudhari
Published on
Updated on

कोल्हापूर : गोकुळ संदर्भात भ्रष्टाचाराचे आरोप करणार्‍या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे काही पुरावे दिले असतील, तर त्यांनी ते पत्रकार परिषदेतून जाहीर करावेत. अन्यथा गोकुळबाबतीतही वॉशिंग मशिन होऊ नये, अन्यथा सर्वसामान्य शेतकरी भरडला जाईल. अशा शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी लढा उभारावा लागेल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी खासदार सुळे शुक्रवारी कोल्हापुरात आल्या होत्या. त्यांनी करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनानंतर ज्येष्ठ विचारवंत एन.डी. पाटील यांच्या घरी सरोज पाटील यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री झाल्या, तर त्यांना पहिला अभिनंदनाचा हार मीच घालेन, असेही खा. सुळे यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, कोल्हापुरात गोकुळवर भाजपच्या सरकारमधील असणार्‍या लोकांवरच सरकारने प्रशासक लावले आहे. याचा अर्थ ‘कुछ तो गडबड है, दाल मे कुछ काला है...’महाराष्ट्र सरकार प्रशासक नेमत असेल आणि त्यांच्याच विचारांचा व मित्र पक्षातील एक आमदार आरोप-प्रत्यारोप करत असेल, तर हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या संस्था लोकांच्या कष्टातून उभारल्या आहेत. अशा संस्थांतील भ्रष्टाचाराची पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे शासनाने सरसकट कर्जमाफी करावी, अशीही मागणी खा. सुळे यांनी यावेळी केली. नसरापूर घटनेचा तीव्र निषेध करत निदा प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यावरच बोलता येईल, असे त्या म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news