प्रेमवेडे तरुण अंधश्रद्धेच्‍या फेर्‍यात, काेल्‍हापुरातील ग्रामीण भागात वाढलीय भोंदूबाबांची 'पॉवर'

बैलगाडी, घोडागाडी, श्वान शर्यतींनाही अंधश्रद्धेचे ग्रहण
Supertration
प्रेमवेडे तरुण अंधश्रद्धेच्‍या फेर्‍यात.Pudhari AI Genrated Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : आशिष शिंदे

ती मला पाहिजेच, काहीही झाले तरी मी प्रेमप्रकरणात यशस्वी झालोच पाहिजे, अशा मोहामुळे प्रेमवेडे अनेक तरुण सध्या भोंदूबाबांच्या मायाजालात अडकत चालले आहेत. तिला पटवण्यासाठी या मंत्राचा जप करा, तिचे नाव लिहून तिचा फोटो झाडाला लटकवा, विशिष्ट वस्त्र किंवा केस मिळवून पूजा करा असे अनेक विचित्र अघोरी उपाय भोंदूबाबांकडून तरुणाईला सुचवले जात आहेत. हे सारे चित्र दुसर्‍या कोणत्या जिल्ह्यातील नाही, तर पुरोगामी समजल्या जाणार्‍या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. शहरालगतच्या ग्रामीण भागात अशा भोंदू बाबांचा अक्षरशः सुळसुळाट सुरू आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात भोंदू बाबांची पॉवर चांगलीच वाढली आहे. अगदी बैलगाडी, घोडागाडी, श्वान शर्यत जिंकण्यापासून ते प्रेमप्रकरणात यशस्वी होण्यापर्यंतच्या सर्व गोष्टींवर अघोरी उपाय या बाबांकडून सुचवले जात आहेत.

Supertration
हमीभावासाठी बळीराजाची अडथळ्यांशी शर्यत

रुमाल टाकताच बैल जाग्यावर बसण्याचा दावा

सध्या वाड्या-वस्त्यांपासून ते अगदी शहरांपर्यंत बैलगाडा, घोडागाडी, श्वान आणि म्हशीच्या शर्यतींची क्रेझ आहे; मात्र या शर्यतींनादेखील भोंदूबाबांनी अंधश्रद्धेचे ग्रहण लावले आहे. रुमाल टाकताच बैल जाग्यावर बसणारच, असे चॅलेंज या भोंदूंकडून दिले जाते. त्यामुळे असल्या भोंदूबाबांना चार-पाचशे रुपये द्यायचे, बैलावरून लिंबू ओवाळून टाकायचा, शर्यतीच्या मैदानावर प्रतिस्पर्धी बैलाच्या नावाने नारळ फोडणे, अंगारा फुंकणे, लिंबू ओवाळून फेकण्यासारखे प्रकार पाहायला मिळत आहेत.

शर्यतीत फोनवरून वशीकरण मंत्र

सध्या तर बैलगाडा शर्यत अंधश्रद्धेच्या मगरमिठीत अडकली आहे. आपला बैलच जिंकावा, यासाठी शर्यत सुरू होताच भोंदूबाबाला फोन लावला जातो. प्रतिस्पर्धी बैलाचे नाव सांगितले जाते. आपल्या पुढे किती गाड्या आहेत, आपल्या मागे किती गाड्या आहेत ही सर्व माहिती दिली जाते. यानंतर बाबाकडून सूचना दिल्या जातात.

भोंदू पॉवरमुळे स्मशानभूमीवर सीसीटीव्ही

शहराजवळच्या गावांमध्ये भोंदूबाबांची पॉवर सध्या चांगलीच वाढली आहे. अघोरी कृत्यांमुळे गावकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. ठरावीक दिवशी तर इतकी गर्दी होते की, गावात पाय ठेवायला जागा नसते. स्मशानभूमीत अघोरी कृत्य होत असल्याने हणमंतवाडी ग्रामपंचायतीला स्मशानभूमीत अक्षरशः सीसीटीव्ही बसविण्याची वेळ आली आहे.’

Supertration
नाशिक : धुरळा उडाला… बैलगाडी शर्यत पहायला आला अन् जीवाला मुकला
लिंबू उतरवून टाकणे किंवा फोटो झाडाला टांगणे या सार्‍या गोष्टी अंधश्रद्धा आहेत. असे प्रकार करणार्‍या भोंदू बाबांची भोंदूगिरी मोडून काढण्याची गरज आहे. अंधश्रद्धा पसरवणार्‍यांवर पोलिसांनी त्वरित कारवाई केली पाहिजे. ग्रामीण भागात शिक्षण, चर्चा आणि प्रबोधनातून या प्रकारावर मात करण्याची गरज आहे.
- सीमा पाटील, महिला राज्य सचिव, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news