Sun ring phenomenon: सूर्याला पडले ‘खळे’! आकाशातील अनोख्या नजाऱ्याने खगोलप्रेमी थक्क

Astronomy news: ज्या 'सिरस' ढगांमुळे हे खळे तयार होते, ते ढग अनेकदा हवामानातील बदल किंवा येणाऱ्या पावसाळी वातावरणाचे पूर्वसंकेत देतात
Sun ring phenomenon
Sun ring phenomenon
Published on
Updated on

दर्शन वडेर

नृसिंहवाडी : निसर्गाच्या किमयेचे अनेक अद्भुत आविष्कार आपल्याला नेहमीच थक्क करत असतात. असाच एक विलोभनीय आणि नयनरम्य नजारा नृसिंहवाडी आणि परिसरातील नागरिकांना नुकताच पाहायला मिळाला. भर दुपारी आकाशात सूर्याभोवती सुंदर व गोलाकार सप्तरंगी कडे (खळे) तयार झाल्याचे दिसून आले. या दुर्मिळ खगोलीय घटनेने खगोलप्रेमींसह सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष वेधून घेतले.

Sun ring phenomenon
Astronomy new discovery | खगोल शास्त्रज्ञांना आढळली ‘उलटी’ सूर्यमाला

सूर्याभोवतीचे हे खळे एखाद्या मोठ्या प्रकाशमान प्रभावळीसारखे भासत होते. वैज्ञानिक भाषेत या खगोलीय आविष्काराला 'सन हॅलो' किंवा '२२ डिग्री हॅलो' असे म्हटले जाते. जेव्हा वातावरणाच्या वरच्या थरात असलेल्या 'सिरस' प्रकारच्या ढगांमध्ये बर्फाचे अतिसूक्ष्म स्फटिक तयार होतात, तेव्हा त्यातून सूर्याची किरणे आरपार जाताना प्रकाशाचे अपवर्तन होते. या नैसर्गिक प्रक्रियेमुळे सूर्याभोवती असे सप्तरंगी किंवा पांढरे वर्तुळाकार कडे निर्माण होते.

Sun ring phenomenon
Thergaon PM Shri School Astronomy Lab: थेरगावच्या पीएम श्री विद्यालयात ‘ॲस्ट्रॉनॉमी लॅब’; विद्यार्थ्यांना मिळणार अवकाशाचा प्रत्यक्ष अनुभव!

ही दुर्मिक घटना नेहमीच पाहायला मिळत नाही. त्यामुळे आकाशात हा अनोखा नजारा दिसताच अनेकांनी आपली कामे थांबवून या दृश्याचा आनंद लुटला. रस्त्यावरून जाणारे नागरिकही कुतूहलाने आकाशाकडे पाहत होते. अनेकांनी तात्काळ आपले मोबाईल फोन काढून हे निसर्गाचे सुंदर रूप कॅमेऱ्यात कैद केले आणि सोशल मीडियावर शेअर करून या घटनेला व्यापक प्रसिद्धी दिली.

Sun ring phenomenon
Radio Astronomy | 'सूर्य गायब होईल आणि चंद्र नेहमीच पूर्ण दिसेल'

विशेषतः लहान मुले आणि खगोलशास्त्राची आवड असणाऱ्या अभ्यासकांसाठी ही एक मोठी पर्वणीच होती. एरवी प्रखर प्रकाशामुळे आपण सूर्याकडे थेट पाहू शकत नाही, मात्र या खळ्यामुळे निसर्गाचे हे मोहक रूप सर्वांना मनभरून पाहता आले.

Sun ring phenomenon
Saturn's rings : शनीच्या ‌‘टायटन‌’ची निर्मिती दोन चंद्रांच्या टकरीतून?

खळे म्हणजे पावसाची चाहूल?

ग्रामीण भागात सूर्याला किंवा चंद्राला खळे पडणे याला अनेकदा 'पावसाचे खळे' असे म्हटले जाते. जुन्या जाणकारांच्या मते, आकाशात असे खळे दिसले की लवकरच हवामानात बदल होऊन पाऊस पडतो. यामागे थोडेफार वैज्ञानिक सत्यही दडले आहे. ज्या 'सिरस' ढगांमुळे हे खळे तयार होते, ते ढग अनेकदा हवामानातील बदल किंवा येणाऱ्या पावसाळी वातावरणाचे पूर्वसंकेत देतात. मात्र, हा केवळ एक नैसर्गिक आणि खगोलीय आविष्कार असून, याला कोणत्याही अंधश्रद्धेशी न जोडता या विलोभनीय दृश्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आनंद घ्यावा, असे आवाहन खगोल अभ्यासक करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news