Sujay Vikhe-Patil | शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांना पसंती क्रमांक १ चे मत द्या : सुजय विखे-पाटील

कोल्हापुरातील प्रचार मेळाव्यास प्रतिसाद; विविध शिक्षक संघटनांचा पाठिंबा
कोल्हापूर : भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे व पदवीधरच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना पाठिंब्यांचे पत्र प्राचार्य अभयकुमार साळुंखे व माजी खा. सुजय विखे-पाटील यांच्याकडे सुपूर्द करताना मोहरे हायस्कूल व आदिवासी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी.
कोल्हापूर : भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे व पदवीधरच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना पाठिंब्यांचे पत्र प्राचार्य अभयकुमार साळुंखे व माजी खा. सुजय विखे-पाटील यांच्याकडे सुपूर्द करताना मोहरे हायस्कूल व आदिवासी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी. (छाया : पप्पू अत्तार)
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी व शिक्षण क्षेत्राचा आवाज विधान परिषदेत पोहोचविण्यासाठी भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांना पसंती क्रमांक १ चे मत देऊन विजयी करा, असे आवाहन सुजय विखे-पाटील यांनी केले.

महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती आणि कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आयोजित भव्य प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, शिक्षक नेते दादासाहेब लाड, माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, संजय डवर, वक्ते मधुकर पाटील प्रमुख उपस्थित होते. विखे-पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत साळुंखे कुटुंबीयांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी जपलेली शैक्षणिक मूल्ये व समाजाभिमुख कार्याचा वारसा कौस्तुभ गावडे पुढे नेत आहेत. शिक्षकांच्या समस्या समजून घेऊन त्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी सक्षम प्रतिनिधी विधान परिषदेत जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

मेळाव्यात शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने आणि शिक्षकांच्या न्याय्य मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याबाबत चर्चा झाली. शिक्षकांच्या हक्कांसाठी ठाम भूमिका घेणारे नेतृत्व आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मोहरे हायस्कूल आणि आदिवासी शिक्षक संघटनेने एक हजार शिक्षकांसह कौस्तुभ गावडे यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी नंदू कांबळे, बाबा पाटील, दत्ता पाटील, सुरेश संकपाळ, संदीप पाटील, एम. आर. पाटील, दीपक पाटील, मनोहर पाटील, अशोक हुबळे, शिवाजी कोरवी, माजिद पटेल, डॉ. डी. एस. घुगरे, बाळ डेळेकर, अनिल चव्हाण, मदन निकम, आनंदा चव्हाण उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news