Sugarcane Tractor Accident: ऊसाने भरलेल्या ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून जुगुळच्या तरुणाचा मृत्यू; बुबनाळ-औरवाड मार्गावर अपघात

कर्नाटकातील जुगुळ (ता. कागवाड, जि. बेळगाव) येथील निलेश आप्पासाहेब पाखरे (वय ३४) यांचा बुबनाळ-औरवाड मार्गावरील कडते-पटेल मळ्यानजीक झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
Sugarcane Tractor Accident
Sugarcane Tractor AccidentFile Photo
Published on: 
Updated on: 

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा

कर्नाटकातील जुगुळ (ता. कागवाड, जि. बेळगाव) येथील निलेश आप्पासाहेब पाखरे (वय ३४) यांचा बुबनाळ-औरवाड मार्गावरील कडते-पटेल मळ्यानजीक झालेल्या अपघातात मृत्यू झाला. शिरोळहून फरशी फिटिंगचे काम आटोपून चुलत भावासोबत दुचाकीवरून गावी परतत असताना ते ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात सचिन परशराम पाखरे (वय ३२) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. बुबनाळहून औरवाडच्या दिशेने उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली जात होती. यावेळी एका पादचाऱ्याला धडक बसल्यानंतर दुचाकीवरील दोघे ट्रॉलीच्या मागील चाकाखाली आल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

अपघाताची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी कुरुंदवाड येथे आणण्यात आला.

निलेशचे वडील हयात नसून, आई आणि निलेश असे दोघेच राहत होते. निलेश हा एकुलता एक मुलगा असून, आईचा आधार होता. त्याच्या अचानक निधनाने आईचा आधार हरपला असून, जुगुळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रात्री उशिरापर्यंत कुरुंदवाड पोलिसांत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.

आईचा एकुलता एक आधार हरपला

निलेशच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. आई आणि निलेश असे दोघेच घरात राहत होते. निलेश हाच आईचा एकमेव आधार होता. अपघातात एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे जुगुळ गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.