kolhapur | ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने ऊसतोड मजुराचा मृत्यू

sugarcane worker accident
kolhapur | ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने ऊसतोड मजुराचा मृत्यू
Published on
Updated on

चंदगड : आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून पैसे वसूल करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन जात असताना ट्रॅक्टरखाली सापडल्याने एका ऊसतोड मजुराचा मृत्यू झाला. ही घटना हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत - अथर्व साखर कारखान्याच्या गाडी अड्ड्यामध्ये घडली. उत्तम दगडू पाळवदे (वय 61, सध्या रा. गाडी अड्डा, दौलत - अथर्व साखर कारखाना, मूळ रा. सासुरा, पो. देवगाव) असे मृताचे नाव आहे. शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची नोंद करण्यासाठी शनिवारी रात्री चंदगड पोलिस ठाण्यात प्रक्रिया सुरू होती.

उत्तम हे दौलत - अथर्वकडे उसतोड मजूर व ट्रॅक्टर चालक होते. शुक्रवारी गाडी अड्ड्यात उसाच्या ट्रॉल्या सोडून ट्रॅक्टर बाजूला लावून ते झोपले होते. यावेळी अज्ञातांकडून रात्री दीडच्या सुमारास ट्रॅक्टर सुरू करून इतर ठिकाणी नेण्याचा प्रकार सुरू होता. या दरम्यान उत्तम झोपेतून उठले. आपला ट्रॅक्टर कोणीतरी नेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी संबंधित व्यक्तीस रोखण्याचा प्रयत्न केला. पण ती व्यक्ती तसाच ट्रॅक्टर पुढे नेत होता. या दरम्यान उत्तम हे ट्रॅक्टर खाली सापडून गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात शनिवारी दुपारी बारा वाजता मृत्यू झाला.

आर्थिक व्यवहारातून प्रकार घडल्याची चर्चा

मृत उत्तम त्यांच्या कुटुंबीयातील एकाचे आणि चंदगड तालुक्यातील काही जणांबरोबर आर्थिक देवाण-घेवाण झाली होती. यातील पैशांची वसुली व्हावी, म्हणून ट्रॅक्टर अन्य ठिकाणी नेण्यात येत होता. यादरम्यान हा प्रकार घडल्याची चर्चा कारखाना ऊस वाहतूकदरामध्ये सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news