Postal Services | आव्हाने पेलत टपाल विभागातर्फे नवनवीन प्रयोग यशस्वी

१७० वर्षांनंतरही पोस्ट सेवेवरील विश्वास टिकून
Postal Services
Postal Services File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : सागर यादव

आधुनिक युगात टपाल पत्र कालबाह्य झाले असले, तरी बदलत्या जमान्यात काळानुरूप बदलाचे आव्हान पेलत टपाल विभागाने नवनवीन प्रयोग हाती घेऊन ते यशस्वी केले आहेत. इतकेच नव्हे तर लोकांना विश्वासू सेवा देणारी तब्बल १७० वर्षांची परंपराही अखंड राखली आहे.

भारतात इसवी सन १८५४ मध्ये कोलकाता येथून अधिकृत टपाल सेवेचा प्रारंभ झाला. पोस्ट विभागातर्फे सन १९६९ पासून दि. ९ ऑक्टोबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय टपाल दिन' म्हणून साजरा केला जातो. मोबाईल-टेलिफोन या गोष्टींचा शोध लागण्यापूर्वी टपाल हे संपकर्काचे एकमेव माध्यम होते.

गल्लीत पोस्टमन आला की लोक त्यांच्यामागे धावत आपल्या पत्राबाबत विचारणा करायचे. कालौघात पत्राचा जमाना इतिहास जमा झाला. आज पत्राची जागा ई-मेल, सोशल मीडियाने घेतली आहे. हजारो किलोमीटर दूर असलेल्या लोकांशी या अत्याधुनिक माध्यमातून तातडीने संवाद होऊ लागला आहे.

काळानुरूप बदलाचा यशस्वी प्रवास

भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन पोस्ट विभागाने काळानुरूप तातडीने बदल केले. आपली सेवा पत्र व्यवहारापुरती मर्यादित न ठेवता लोकोपयोगी विविध सेवा पोस्टाने सुरू केल्या आहेत. त्याला नवतंत्रज्ञानाची जोड देऊन पोस्टाच्या विविध सेवा गतिमान केल्या. याचा वापर जगभरातील कोट्यवधी लोक घेऊ लागले आहेत.

पत्रव्यवहार, इलेक्ट्रॉनिक मनीऑर्डर, इंटरनॅशनल मनी ट्रान्स्फर, मनिग्राम या सेवांबरोबरच बँकिंग, विमा बचत बैंक, आरडी, मुदतठेव, वरिष्ठ नागरिक योजना, मंथली इन्कम स्कीम, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, ग्रामीण डाक जीवन विमा, आधार कार्ड बायोमेट्रीक, पेन्शनर्सची जीवन प्रमाणपत्र, किसान व लाडकी बहीण अशा विविध शासकीय सेवा व योजना पोस्टाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचल्या आहेत.

ई-कॉमर्स सेवा १८ महिन्यांत तिप्पट

इंडिया पोस्ट-अॅमेझॉन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. अॅमेझॉनची तंत्रज्ञान क्षमता व इंडिया पोस्टचे नेटवर्क या सहयोगातून ई-कॉमर्स पार्सलची सेवा १८ महिन्यांत तिप्पट करण्यात आली आहे. भारताच्या दुर्गम व ग्रामीण भागातही ही सेवा सुरू आहे.

पोस्टाच्या विश्वासू सेवेला नागरिकांची पसंती

प्रगत आणि अद्ययावत तंत्रज्ञान प्रणाली उपलब्ध असली तरी आजही महत्त्वाची कागदपत्रे, पेन्शन पोहोचवण्याचे काम पोस्ट विभागाच्या पोस्टाच्या विश्वासू सेवेला नागरिकांची पसंती प्रगत आणि अद्ययावत तंत्रज्ञान माध्यमातूनच पूर्ण होते. नागरिकांकडून पोस्टाच्या विश्वासू सेवेला मोठी पसंती कायम आहे.

Here are some meta keywords for the topic:

**Meta Keywords:**

- modern postal services

- postal department innovations

- evolution of postal services

- 170 years postal tradition

- challenges in postal sector

- trusted postal services

- postal department success

- new postal experiments

- adapting to changing times

- relevance of postal services

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news