कोल्हापूर : डेंग्यूसद़ृश आजाराने विद्यार्थ्याचा मृत्यू

डेंग्यू सदृश आजाराचा बळी ठरला विद्यार्थी
Student dies of dengue-like illness
सरनोबतवाडी 11 वर्षांच्या विद्यार्थ्याचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला.Pudhari File Photo

उचगाव : सरनोबतवाडी येथील जोरेज एजाज तकीलदार या 11 वर्षांच्या विद्यार्थ्याचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मोरेवाडीतील एका शाळेत जोरेज चौथीच्या वर्गात शिकत होता. तो आजरा येथे गेला होता. घरी आल्यावर जोरेज यालाही लक्षणे दिसू लागली.

हणमंतवाडीत डेंग्यूचा उद्रेक

कोल्हापूर : हणमंतवाडी (ता. करवीर) येथे डेंग्यू रुग्णांचा उद्रेक झाला आहे. जिल्हा हिवताप कार्यालयाचे पथक व ग्रामपंचायत प्रशासनाने गुरुवारी सर्व्हे करून गावात औषध फवारणी केली. संशयित 10 रुग्णांच्या रक्ताचे नमुने शेंडा पार्क येथील सेटिनल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान गावात 20 हून अधिक रुग्ण असल्याचे समजते. गावात ताप, सर्दी, अंगदुखीसह डेंग्यूचे संशयित दहा ते बारा रुग्ण होते. त्यापैकी पाच रुग्ण बरे झाले आहेत. उर्वरित रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती सरपंच तानाजी नरके यांनी दिली. साथीचा फैलाव होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीने दोनवेळा सर्व्हे करून औषध फवारणी करण्यात आली आहे.

डेंग्यू उत्पत्ती ठिकाणे नष्ट करून औषध फवारणी

ग्रामपंचायतीने डबके साचलेल्या पाण्यात तसेच डेंग्यू उत्पत्ती ठिकाणे नष्ट करून औषध फवारणी केली आहे. गावातील प्रत्येक घराचा सर्व्हे करण्यात आला आहे. पाचजणांचा तपासणीत डेंग्यू अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यांच्यासह एकूण 10 जणांचे रक्ताचे नमुने सेटिनल लॅबकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. यानंतर संबंधित रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आहेत का, हे स्पष्ट होईल येईल अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर यांनी दिली. हणमंतवाडी गावास प्रभारी सहायक संचालक मलेरिया डॉ. योगेश साळे, प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, वैद्यकीय अधिकारी मोहिनी बर्गे, जे. के. कांबळे, कुमार कांबळे यांनी भेट देऊन पहाणी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news