बलिकांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सरूड येथे कडकडीत बंद

Kolhapur bandh | सरकारविरोधात काळी फित बांधून निदर्शने, मूकफेरी
Sarud bandh
सरुड येथे अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला.Pudhari News Network
Published on
Updated on

सरूड : पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील सरुड येथे बदलापूर, पुणे, कोल्हापुरात बालिकांवर लागोपाठ झालेल्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ शनिवारी (दि. २४) कडकडीत बंद पाळण्यात आला होता. यावेळी राज्यातील महिला, मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत निदर्शने करण्यात आली. सरूडच्या बसस्थानक परिसरात हे आंदोलन झाले. यावेळी आंदोलकांनी काळी मुखपट्टी, दंडावर काळी फित बांधून लैंगिक अत्याचारांच्या घटनांचा तीव्र निषेध नोंदवला. (Kolhapur bandh)

न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह 

शेकापचे भाई भारत पाटील यांनी आपल्या मनोगतात महाराष्ट्र राज्यातील लैंगिक अत्याचाराच्या घटना तसेच मुलींच्या बेपत्ता होण्याचे वाढते प्रमाण क्लेशदायक असून या घटनांवर प्रशासनासह समाजाचा हवा असणारा अंकुश आजघडीला लोप पावल्याची चिंता व्यक्त केली. शिवाय शुक्रवारी अचानक झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या बंदबाबत एक अवाक्षर न काढणारी न्यायव्यवस्था महाविकास आघाडीने पुकारलेला बंद हा बेकायदेशीर ठरवते, याचा अर्थ न्यायालय देखील वेगळ्याच वाटेवर चालल्याची मनोमन खंत व्यक्त केली. सरूडचे सरपंच भगवान नांगरे, शिवसेना ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी पदाधिकारी अलका भालेकर, तंटामुक्त अध्यक्ष बाबासो पाटील, भीमराव पाटील, बळवंत सोमोशी, निवास कदम, गणेश पाटील आदींसह स्थानिक ग्रामपंचायत व विविध संघटनांचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

दरम्यान, श्रीशिव-शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींनी कॉलेजपासून, बसस्थानक, नारायण पेठ, बाजारपेठ, निनाई मंदिर अशी गावातील प्रमुख मार्गावरून मूकफेरी काढून बदलापूर, पुणे, कोल्हापूर येथे साखळीने झालेल्या बालिका अत्याचार घटनांचा निषेध नोंदवला.

Sarud bandh
कोल्हापूर : भोसलेवाडी येथील 18 लाखांची लूट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news